हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजे ‘महाराष्ट्र कृषी दिन’
नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आज आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते म्हणजे वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजे १ जुलैला ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये स्व वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे.यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती ‘महाराष्ट्रात कृषी दिन’ म्हणून साजरी केली जाते. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन” असे वसंत राव नाईक यांनी १९६५ मध्ये सांगितले होते.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपूर्वी कृषी शास्त्रज्ञांनी सांगितला हा सल्ला
त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन वसंतराव नाईक यांनी राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते, ‘शेती आणि शेतकरी’ हे नेहमीच त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले. महाराष्ट्रातील शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां ची स्थापना केली.अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन दिली.दुष्काळ निवारणाचा शाश्वत मार्ग दाखवत त्यांनी १९७२ च्या दुष्काळाचे संकट आव्हान म्हणून स्विकारले आणि,राज्याच्या कृषी विकासाला योग्य दिशा दिली.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: कांदा निर्यातीला परवाणगी, दरात होईल सुधारणा
‘रोजगार हमी योजने’तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करतो. शेतकऱ्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते तसेच वसंतराव नाईक यांची जयंतीचे औचित्य साधून आपन देखील कृषी दीन साजरा करुया. आजही शेतकऱ्यांची स्थिती बिकट झालेली आहे,आजच्या कृषी दिनापासून आपण सर्वांनी शेतकऱ्यांप्रती असलेले सामाजिक भान लक्षात घेऊन त्यांच्या या बिकट काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणं ही काळाची गरज आहे,कारण “शेतकरी जगला तरचं आपण जगू”.
रेशीम शेती: शेतकऱ्यांना कमी वेळात भरपूर उत्पन्न, तुती लागवडीसह रेशीम किड्याचे पालन करा,वाचा संपूर्ण माहिती
तसेच राज्यातील शेतकऱ्यांला महाराष्ट्र म्हणजे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …..
मिलिंद जी गोदे
आज पासून संपूर्ण देशात प्लास्टिक बंद, वापरल्यास व विक्री केल्यास भरावा लागेल लाखोंचा दंड