“मागेल त्याला शेततळे” योजना संपूर्ण माहिती
वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असतात. अशीच एक अत्यंत महत्वाची योजना आता सरकारने राबवली आहे ती म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना. टंचाई ग्रस्त भागांमध्ये पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ही योजना राबवली जात आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरत असते. या योजने अंतर्गत लाभार्थ्यास पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात.
योजनेच्या अटी –
१. कृषिविभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे तयार करणे बंधनकारक आहे.
२. कमाल तीन महिन्यात शेततळ्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
३. पावसाळ्यात शेततळ्यात गाळ वाहून जाणार नाही , त्यात गाळ साचणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.
४. शेततळाच्या दुरुस्तीची , निगा राखण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहील.
५. शेततळावरील प्लास्टिक अस्तरीकरण खर्च शेतकऱ्यांनी करावा.
योजनेसाठी अर्ज कसा करावा –
१. अर्ज भरण्यासाठी आपल्या प्रोफाइल वरून लॉगिन करावे.
२. अर्ज दाखल केल्या नंतर आपला एप्लिकेशन नंबर लिहून ठेवावा.
३. फॉर्म डाउनलोड करून त्या वर सही करावी.
४. अत्यावश्यक सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा.
https://egs.mahaonline.gov.in/