लीची खाण्याचे फायदे …
अतिशय मधुर, रसाळ. उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारे फळ. हे देखील फळ मूळचे दक्षिण चीनमधले. बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर व अर्धपारदर्शी. मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यान लीची बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. भारतात बिहार व पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लागवड केली जाते.
कोणी खावे ?
लीची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडीत असलेले विकार काढून टाकणारे फळ आहे. त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रियासंवर्धक तसेच निद्रानाशमुक्त करणारे आहे. भारतात लीचीच्या ‘बी’पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो. ह्या फळामध्ये पोटॅशियम व तांबे ही खनिजे जास्त प्रमाणत असल्याने हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर गुणकारी आहे. या फळाला त्वचेचा खास दोस्त मानला जातो, ते त्यातील ओलीगोनॉल रसायनामुळे. या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. .
कोणी खाऊ नये ?
लीची हे फळ गोड असल्याने मधुमेहींनी टाळावे .