लिंबाचे भाव ‘झुकेगा नही साला’ १ लिंबू १५ रुपयांना
सध्या सगळीकडे लिंबूचीच चर्चा रंगताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे लिंबूच्या दरामध्ये होणारी वाढ आणि त्यात भयानक उन्हाळा. यंदा लिंबूच्या दराने रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
सोशल मीडिया वर तर लिंबुवर वेगवेगळे विनोद बनविले जात आहे. ठाणे बाजारपेठेत तर एक लिंबू १५ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा (Read This) आता नोकरी १२ तासांची, पगार पण कमी, पीएफ वाढणार- १ जुलैपासून मोदी सरकार लागू करणार नवे नियम ?
दर वाढून देखील खरेदी जोरदार सुरु
लिंबूचे दर गगनाला भिडले असल्याने सध्या लिंबूची जोरदार चर्चा सुरू आहे. लिंबू महागला तरी हॉटेल्स, पोळी भाजी केंद्र, उपाहारगृहांकडून लिंबूची खरेदी सुरू आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात लिंबूपाणी हे सर्वांचे आवडीचे पेय असते. यामुळे लिंबूची खरेदी ही सुरु आहे.
हे ही वाचा (Read This) ब्राह्मी या औषधी पिकाची लागवड करून मिळवा अधिकचा नफा
उन्हाळ्यात लिंबूपाणी पिण्याचे प्रमाण वाढते
उन्हाळ्यात भूक कमी लागते. त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. मात्र उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या दिवसांत लिंबू सरबत पिण्याचे प्रमाण वाढते.
हे ही वाचा (Read This) केळीच्या फांद्यापासून सेंद्रिय खत बनवून नफा कमवू शकतात शेतकरी
लिंबू, मिरची २० रुपये प्रति
घराच्या दरवाज्याला, दुकानाला, हातगाडीला अनेक जण लिंबू मिरची टांगतात. हे लिंबू मिरची ५ रुपये दराने मिळत होते ते आता २० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता लिंबू मिरची टांगावे की नाही असा प्रश्न पडला आहे.
हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय