लवंगचे फायदे वाचून तुम्ही व्हाल थक्क
घरोघरी मसाल्याच्या डब्यात हमखास उपलब्ध असणाऱ्या लवंगचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. लवंग आकाराने लहान दिसत असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. आयुर्वेदामध्ये हिचे खूप महत्व आहे. लवंगमध्ये युजेनॉल असते. लवंग दात दुखीवर अतिशय उपयोगी ठरते. लवंगचे अजून फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
लवंगचे फायदे –
१. लवंग मध्ये अँटिऑक्सिडेंट असतात त्यामुळे त्वचा सॉफ्ट , चमकदार होते.
२. लवंग मध्ये ए जीवनसत्वे असतात त्यामुळे डोळ्यांची शक्ती टिकून राहण्यास मदत होते.
३. गुडघेदुखी , सांधेदुखी वर लवंगाचे तेल लावल्यास आराम मिळतो.
४. ऍसिडिटी , पिताच त्रास होत असल्यास पाण्यात लवंग मिसळून पिल्यास त्रास कमी होतो.
५. सर्दी झाल्यास नाक बंद झाल्यास लवंग तेलाचा वास घेतल्यास नाक मोकळे होते.
६. दात दुखत असेल तर लवंग चावावी . टूथपेस्ट मध्ये लवंग चा वापर केला जातो.
अशी ही लवंग आकाराने लहान असली तरी अत्यंत उपयोगी ठरते.