पिकपाणी

लाल रंगाची भेंडी लागवड

Shares

आपण रोजच्या आहारात विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या खात असतो.त्यामधून आपल्याला जीवनसत्वे, विविध खनिजे, कर्बोदके मिळतात, जी आपल्याला निरोगी राहण्यासाठी महत्वाची असतात. अशीच एक रोजच्या आहारातील सर्वांची आवडती भाजी म्हणजे भेंडी. तुम्ही जी भेंडी खाता त्या भेंडीमधून जर तुम्हाला जास्तीचे पोषक घटक मिळाले तर तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. या लाल भेंडी मध्ये अॅन्थोसायानीन नावाचे अँटिऑक्सिडंट खाण्यास मिळते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. लाल भेंडी जातीची लागवड खरीप मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व उन्हाळ्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात करावी. ही जात प्रतिकूल तापमान सहन करू शकते. पीक कालावधी १२० ते १३० दिवसांचा असून काढणी सुरू व्हायला ४०-५० दिवस लागतात. भेंडीच्या फळांचा रंग लालसर असून लांबी ७ ते ८ इंच व उत्पन्न एक ते दीड किलो प्रतिझाड आहे.लाल भेंडी या जातीची लागवड जम्मू आणि काश्‍मीर वगळता संपूर्ण भारतात केली जाऊ शकते. ही जात पौष्टिक व शिजवल्यानंतर कमी चिकट असल्याने बाजारात तिला जास्त मागणी आहे.

संशोधन केलेली संस्था –
भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था, वाराणसी (उत्तर प्रदेश)

जमीन व हवामान-
उष्ण व समशीतोष्ण वातावरण पोषक, पोयट्याच्या जमीन उत्तम

मिनरल/खनिज द्रव्ये उपलब्धता प्रमाण –
लोह – ५१.३ पी.पी.एम
झिंक -४९.७ पी.पी.एम
कॅल्शियम -४७६.५ पी.पी.एम

लागवड-
खरीप – जुलैचा पहिला आठवडा (१५ जून ते १५ जुलै)
उन्हाळी – जानेवारीचा तिसरा आठवडा (१५ जानेवारी ते १५ फुब्रूवारी)

बियाणे प्रमाण-
१२-१५ किलो/हेक्टर

बीजप्रक्रिया-
पेरणीपुर्वी १-२ ग्रॅम कार्बेन्डेंझीम व २ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + २५ ग्रॅम अझोस्पिरीलम ब्रासिलेन्सी किंवा अॅस्पेरजीलस अवमोरी प्रति किलो बियाण्याला चोळावे.

लागवड अंतर –
३० × १५ सें.मी.

खतमात्रा-
शेणखत २० टन प्रती हेक्टर पूर्वमशागत करताना, रासायनिक खताची मात्रा १०० किलो नत्र, ५० किलो स्पुरद व ५० किलो प्रती हेक्टर दयावी.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन –
१. सेंद्रिय खते – २० टन शेणखत प्रती हेक्टर
२. जीवाणू खाते – अॅझोटोबॅक्टर व स्पुरद विरघळणारे जीवाणू २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे.

खते देण्याची वेळ –
१. सेंद्रिय खते पेरणीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावीत.
२. रासायनिक खते – १०:५०:५० नत्र:स्पुरद:पालाश किलो प्रती हेक्टर. अर्धे नत्र संपूर्ण स्पुरद पालाश पेरणीच्या वेळी ध्यावे व उर्वरित ५० किलो नत्र तीन समान हफ्त्यामध्ये विभागून ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे.
३. जीवाणू खाते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
४. माती परीक्षणानुसार सुक्ष अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीत फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो प्रती हेक्टर + बोरॅक्स ५ किलो प्रती हेक्टर पेरणीच्या वेळी जमिनीतून किंवा फेरस सल्फेट + झिंक सल्फेट ०.५ % बोरिक अॅसीड ०.२ % पेरणी नंतर ३० ते ४५ दिवसांनी फवारावे.

आंतरमशागत-
१. २-३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी. २. मजुरांची टंचाई असल्यास बासालींन तणनाशक २-२.५ लिटर ५००लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे.तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.
३. तणनाशकाचा फावरणीनंतर ७ दिवसांनी पेरणी करावी.
४. फळे येण्याच्या वेळेस रोपांना भर द्यावी. सरीमध्ये गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे किंवा पालापाचोळ्याचे किंवा रंगीत प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहतो व तणाचा त्रास कमी होतो.

पाणी व्यवस्थापन-
खरिफ हंगामामध्ये लागवड असल्या कारणाने पाण्याची गरज भासत नाही, जर पुसणे टन दिलाच तर दोन पाण्याच्या पाळ्या बसायला हव्यात.

काढणी-
१. पेरणी नंतर ३५-४५ दिवसात फुले येतात व त्यानंतर ५-६ दिवसात फळे तोडणी योग्य होतात. २. कोवळ्या फळाची काढणी तोडा सुरु झाल्यास २-३ दिवसाच्या अंतराने करावी.
३. तोडणीसाठी म. फु.कृ. विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा.
४. निर्यातीसाठी ५-७ सेमी लांब कोवळी एकसारखी फळाची तोडणी करावी.
५. काढणी सकाळी लवकर करावी. काढणी नंतर शून्य ऊर्जा शीत कक्षा मध्ये भेंडीचे पूर्व शीतकरण करावे.

उत्पन्न , मागणी आणि नफा –
१५-२० टन प्रती हेक्टर पर्यंत उत्पादन होते.
पौष्टिक आणि कमी चिकट आणि या बरोबर पिकांच्या नोंदणीमुळे राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर बाजारात जास्त मागणी आहे व शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *