योग्य कलमांची निवड हाच यशस्वी फळबागेचा पाया
फळझाडांच्या लागवडीपासून मिळणारी दर एकरी अधिक आर्थिक उत्पन्न व फळांचे आहारातील महत्त्व यांची लोकांना आलेली जाणीव व त्यामुळे फळांची अधिक मागणी या गोष्टींमुळे फलोद्यान क्षेत्रामध्ये दिवसेदिवस अधिक वाढ होत आहे. नवनवीन सिंचन योजनांमुळे पाण्याखाली येणा-या क्षेत्रात फळझाडांच्या लागवडीला खूप वाव आहे. वाहतुकीकरिता तयार होत असलेले नवीन रस्ते, फळांच्या विक्रीच्या बाबतीत नवीन बाजारपेठांची उपलब्धता, परदेशी निर्यातीची वाट, या सा-या गोष्टी फळबागांच्या विकासाला चालना देणा-या आहेत.
फलोद्यान विकासाकरिता सरकार सुलभ कर्जपुरवठा, सुधारित तंत्रज्ञान व जातिवंत व खात्रीलायक कलमांचा पुरवठा या गोष्टी बागायतदारांना उपलब्ध करून देत आहे. याकरिता कृषी विद्यापीठे नवी तंत्रज्ञान विकसित करून ते विद्यापीठाच्या विविध यंत्रनेमार्फत तसेच वर्तमानपत्र, आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमांमार्फत बागायतदारांनपर्यंत पोहचविण्याचे मोलाची कामगिरी करीत आहेत.
महाराष्ट्रातील निरनिराळे हवामान व जमीन लक्षात घेता राज्याचे चार प्रमुख विभाग पडतात. त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे कोंकण विभाग. या विभागात आंबा, नारळ, चिकू, काजू, सुपारी हि महत्त्वाची फळपिके आहेत. दुसरा महत्वाचा विभाग हा खानदेश असून या विभागात केळी हे महत्त्वाचे पिक आहे. तिसरा महत्त्वाचा विभाग म्हणजे नागपूर लगतचा भाग होय. या विभागात संत्रा हे महत्त्वाचे पिक असून नागपूर विभागातून नागपूर संत्राचे इतर राज्यात व परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. चौथ्या विभागात राज्यातील मध्यभाग आणि दक्षिण-पूर्व भागातील कोरडवाहू भाग येतो. या विभागात द्राक्ष, मोसंबी हि फळपिके प्रामुख्याने होतात, या विभागात कमी पाण्यावर येणारे बोर, अंजीर, फालसा, डाळिंब, सिताफळ या पिकांच्या लागवडीस खूप वाव आहे.
जातिवंत फळ रोपांची व कलमांची आवश्यकता:
१. फलोद्यान लागवडीत जातिवंत कलमे व रोपांचा पुरवठा होणे हे अतिसय महत्त्वाचे आहे. कलमे व रोपांचा पुरवठा हा खाजगी रोपवाटिका, सरकारी व कृषी विद्यापीठ रोपवाटिका यांतून प्रामुख्याने होतो.
अगदी अलीकडे बाहेरच्या राज्यांतून काही व्यापारी ट्रकमधून रोपे व कलमे पावसाळ्यात आणून त्यांची विक्री करतात.
२. फळझाडांच्या किफायतशीर लागवडीत कलमांच्या निवडीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे रोपांचा व कलमांचा जातीवन्तपणा अत्यंत महत्वाचा आहे नाहीतर फळबागांचे भविष्य धोक्यात येण्याचा
संभव असतो.
३. चांगली शुद्ध व जातिवंत रोपे किंवा कलमे न घेतल्यास फळबागांमध्ये गुंतविलेले भांडवल व श्रम काही काही वर्षानंतरच वाया जाण्याचा मोठा धोखा असतो.
४. सरकारी व कृषी विद्यापिठे यांच्याकडून जातिवंत व चांगली रोपे मिळत असली तरी अशा रोप्वातीकांची संख्या मर्यादित असल्यामुळे त्यांच्यातून होणारा कलमांचा व रोपांचा पुरवठा देखील मर्यादित आहे. त्यामुळे अनेक खाजगी रोपवाटिका धारक त्यांचा गैफायदा उठविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५. फळ बागायतदारांना निकृष्ठ रोपांची व कलमांची विक्री होऊ नये, त्यांना जातिवंत व खात्रीशीर रोपांची व कलमांची उपलब्ध व्हावी या दृष्टीने महत्वाच्या फळझाडांची कलमांची व रोपांची लागवड करण्यापूर्वी ती विकत घेताना कशी निवड करावी त्या दृष्टीकोनातून काही महत्वाची माहिती बागायतदार शेतकरी बंधुंसाठी देत आहोत.
संत्रा कलमांची निवड:
संत्रा कलमे शेतात लावताना योग्य कलमांची निवड करावी.
कलमाची जाडी पेन्शील जाडीची असावी,
कलमांची उंची ५ ते १०० से.मी.असावी,
कलमीकरण २० ते २२ से.मी. उंचीवर केलेले असावे,
कलम परिपक्व व सालीवर पांढ-या रेषा असाव्यात,
कलमांची मुळसंस्था बळकट असावी, भरपूर तंतुमय मुळे फुटलेली असावीत,\ कलमांचे वय ८ ते ९ महिन्यांचे असावे म्हणजेच कलमीकरण ८ ते ९ महिन्यापूर्वी केलेले असावे,
कलम हि जंभेरी किंवा रंगपूर लाईम या खुंटावर बांधलेली असावी,
कलम सहढ, किड व रोगममुक्त व जातिवंत नागपूर संत्राच्या मातृवृक्षपासून तयार केलेली असावी. .केळी रोपांची निवड: केळी रोपे शेतात लावताना योग्य रोपांची / उतिसंवर्धित रोपांची निवड करावी. केळीची मुनवे / कंद गड्डे किंवा उतीसंवर्धन रोपे शेतात लावताना योग्य मुनवे / कंद गड्डे किंवा उतीसंवर्धन रोपांची निवड करावी.
कंद १०० – ७५० ग्राम वजनाचे असावेत.
कंद नारळाच्या आकाराचे ,सरळसोट , तलवारीच्या पात्यासारखी अरंद पाने असलेली मुनवे लागवडीसाठी वापरावी.
मुनवे सुमारे २ ते ३ महिने वयाची असावीत.
हेक्टरी ४४४४ कंद लागतात..
उतीसंवर्धन रोपे जातिवंत मातृवृक्षांपासून तयार केलेली असावीत. कृषी विद्यापीठ प्रयोग शाळेतून किंवा सरकारी रोपवाटिकेतून रोपे विकत घ्यावीत.
केळीची उतिसंवर्धित रोपे हि प्रमाणीत प्रयोगशाळा, खात्रीशीर पान्हेरीतून खरेदी करावी.
उतिसंवर्धित रोपे ही किमान ६० दिवस सक्षमीकरण केलेली (रोपांची प्राथमिक हार्डनिंग ४५ दिवस आणि द्वितीय हार्डनिंग ५ दिवस ग्रीन हाउसमध्ये झालेली असावीत) व साधारणत: 30 से.मी. उंचीची, किमान ५ ते ६ से.मी. जाडीची असावीत.
उतिसंवर्धित रोपांना ४ ते ५ प्रकाश संश्लेषणद्रुष्ट्या क्रियाशील पाने असावीत व दोन पानांमधील अंतर ५ से.मी. पेक्षा कमी नसावे.
योग्य सक्षमीकरण / हार्डनिंग केलेली रोपे ही पानावरील कोणतेही डाग, खोडकिड व इतर रोग व किडपासून मुक्त असावीत.
टिप : केळीची उतिसंवर्धित रोपे ही जैवतंत्रज्ञान केंद्र, कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे उपलब्ध आहेत..
आंबा कलमांची निवड:
आंबा कलमे शेतात लावताना योग्य कलमांची निवड करावी.
कलमाची जाडी पेन्शील जाडीची असावी,
कलमांची उंची ५० ते ६० से.मी.असावी,
कलमीकरण २० ते २२ से.मी. उंचीवर केलेले असावे,
कलम परिपक्व व साल हिरवीगार असावी. ससावी, भरपूर तंतुमय मुळे फुटलेली असावीत,
कलमांचे वय १० ते १२ महिन्यांचे असावे.
कलम ही गावठी आंब्याच्या खुंटावर बांधलेली असावी,
कलम सहढ, किड व रोगममुक्त व जातिवंत आंब्याच्या मातृवृक्षपासून तयार केलेली असावी. चिकू कलमांची निवड: चिकू कलमे शेतात लावताना योग्य कलमांची निवड करावी
कलमाची जाडी पेन्शील जाडीची असावी,
कलमांची उंची ५० ते ६० से.मी.असावी,
कलमीकरण २० ते २२ से.मी. उंचीवर केलेले असावे,
कलम परिपक्व व साल हिरवीगार असावी.
कलमांची मुळसंस्था बळकट असावी, भरपूर तंतुमय मुळे फुटलेली असावीत,
कलमांचे वय ८ ते १० महिन्यांचे असावे.
कलम ही खिरणीच्या खुंटावर बांधलेली असावी,
कलम सहढ, किड व रोगममुक्त व जातिवंत चिकूच्या मातृवृक्षपासून तयार केलेली असावी. पेरू कलमांची निवड: पेरू कलमे शेतात लावताना योग्य कलमांची निवड करावी.
कलमाची जाडी पेन्शील जाडीची असावी,
कलमांची उंची ४० ते ६० से.मी.असावी,
कलमीकरण २० ते २४ से.मी. उंचीवर केलेले असावे,
कलम परिपक्व असावी. – कलमांची मुळसंस्था बळकट असावी, भरपूर तंतुमय मुळे फुटलेली असावीत,
कलमांचे वय ७ ते ९ महिन्यांचे असावे.
कलम सहढ, किड व रोगममुक्त व जातिवंत पेरूच्या मातृवृक्षपासून तयार केलेली असावी. सिताफळ कलमांची निवडः सिताफळ कलमांची शेतात लावताना योग्य कलमांची निवड करावी.
कलमाची जाडी पेन्शील जाडीची असावी,
कलमांची उंची ५० ते ६० से.मी.असावी,
कलमीकरण २० ते २४ से.मी. उंचीवर केलेले असावे,
कलम परिपक्व असावी.
कलमांची मुळसंस्था बळकट असावी, भरपूर तंतुमय मुळे फुटलेली असावीत,
कलमांचे वय ५ ते ६ महिन्यांचे असावे.
कलम सदृढ, किड व रोगममुक्त व जातिवंत सीताफळाच्या मातृवृक्षपासून तयार केलेली असावी.
पपई रोपांची निवड:
पपई रोपांची शेतात लागवड करण्यापूर्वी योग्य रोपांची निवड करावी.
रोपे जातिवंत जातींच्या बियाणांपासून तयार केलेली असावीत.
रोपे ही प्रमाणीत व खात्रीशीर पन्हेरीतून खरेदी करावी.
रोपे ही साधारणत; 30 से.मी. उंचीची, किमान ३ ते ४ से.मी. जाडीची असावीत.
रोपांना ४ ते ५ प्रकाश संश्लेषणद्रुष्ट्या क्रियाशील पाने असावीत.
योग्य सक्षमीकरण / हार्डनिंग केलेली रोपे ही पानावरील कोणतेही डाग, इतर रोग व किडपासून मुक्त असावीत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील फळशास्त्र विभागाच्या फळरोपवाटिकेमध्ये शुद्ध व जातिवंत कलमा व रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फळझाडांच्या कलमा व रोपाकरिता ” प्रभारी अधिकारी, फळबाग रोपवाटिका, यांचेशी संपर्क साधावे”. दूरध्वनी क्रमांक ९४२२१९३२१८