झेंडूचे फुल आणि त्यांच्या जाती
फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात झेंडूच्या पिकाची मागणी अत्यंत मोठ्या संख्येने आहे.महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात झेंडूचे उत्पादन पुणे,अहमदनगर,सातारा ,औरंगाबाद,नागपूर आणि नाशिक येथे घेतले जाते. झेंडू लागवडीखाली जवळ जवळ २०० हेक्टर क्षेत्र आहे. झेंडू या फुलाची मागणी वर्षभर असते . लग्न कार्यांत आणि दररोज देवा पुढे वाहण्यासाठी झेंडू फुलाचा वापर भारतात मोठ्या संख्येने करतात.महाराष्ट्रात तीनही हंगामात झेंडूची लागवड करता येते.
झेंडूच्या जाती –
झेंडूमध्ये अनेक जाती , प्रकार आहेत. झेंडूच्या रंग , आकार , उंची यानुसार आफ्रिकन आणि फ्रेंच अश्या दोन प्रकारात त्यांचा समावेश होतो. आपण आज ते जाणून घेऊयात.
आफ्रिकन झेंडू –
१. आफ्रिकन झेंडूची झाडे १०० ते १५० सेमी पर्यंत वाढतात.
२. या फुलांचा रंग केशरी आणि पिवळा असतो .
३. या प्रकारात पांढरी फुले असलेली जात विकसित झाली आहे.
४. या प्रकारातील फुले मोठ्या प्रमाणात हार बनवण्यासाठी वापरतात.
५. ती फुले दिसायला टपोरी दिसतात.
आफ्रिकन झेंडूच्या जाती –
१. यलो सुप्रीम
२. स्पॅन गोल्ड
३. क्रेकर जॅक
४. आफ्रिकन ट्वाल डबल मिक्सड
५. हवाई
६. सन जायंट
७. आफ्रिकन डबल ऑरेंज
फ्रेंच झेंडू –
१. फ्रेंच झेंडूची झाडे बुटकी ३० ते ४० सेमी उंचीची असतात.
२. या फुलांचा आकार लहान ते मध्यम असतो.
३. यांच्या रंगात विविधता असते.
फ्रेंच झेंडूच्या जाती –
१. स्प्रे
२. बटर बॉल
३. फ्लेश
४. लेमन ड्राप्स
५. फ्रेंच डबल मिक्सड
फ्रेंच हायब्रीड –
१. या प्रकारात झाडे माध्यम उंचीची असतात.
२. थंडीचा काळ वगळता इतर हंगामात याचे पीक घेता येते.
३. ही झाडे भरपूर फुले देतात.
फ्रेंच हायब्रीडच्या जाती –
१. पेटिट
२. जिप्सी
३. रेड हेड
४. कलर मॅजिक
५. हार बेस्टमून
६. क्वीन सोफी
झेंडूच्या काही प्रचलित जाती –
१. मखमली – ही जात बुटकी असते. यांची फुले दुरंगी असतात. ह्या जातीचे रोप तुम्ही कुंडीत देखील लावू शकता.
२. गेंदा – या जातीमध्ये पिवळा आणि भगवा गेंदा असे दोन प्रकार पडतात. यांची मागणी हारासाठी सर्वात जास्त आहे.
३. गेंदा डबल – या जातीची फुले आकाराने मोठी असतात परंतु संख्येने कमी येतात. या जातीच्या फुलांना कटफ्लॉवर म्हणून ओळखले जाते.