जगभर निर्यात करून मिळवा लाखों रुपये
जगभर इसबगोल ची निर्यात भारतातून केली जाते.इसबगोल ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. इसबगोल पिकाचे बी शीतल , शामक, असते. सौंदर्यप्रसाधनात याचा वापर केला जातो. बद्धकोष्टता, पचनसंस्था आदींच्या तक्रारींवर उत्तम उपाय म्हणून याचा उपयोग केला जातो.शरीरातील टाकाऊ घटक बाहेर पडण्यास ही वनस्पती मदत करते. वजन कमी करण्यास ही वनस्पती मदत करते. आपण गुणधर्मांनी संपूर्ण अश्या वनस्पतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
इसबगोल शेती लागवड –
१. सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते.
२. उत्तम पाण्याचा निचरा करणारी जमीन निवडावीत.
३. या पिकास थंड व कोरडे हवामान मानवते.
४. लागवड करण्यापूर्वी ३० ते ३५ गाड्या शेणखत घालून जमिनीची मशागत करून घ्यावी.
५. या पिकाची पेरणी ओक्टोबर ते डिसेंबर महिन्यात करतात.
६. पेरणी केल्यानंतर लगेच या पिकास पाणी दिले जाते.
७. हे पीक साडेतीन ते चार महिन्यांनी मार्च-एप्रिल महिन्यात काढणीस तयार होते.
८. या पिकाची कंपनी केल्यानंतर मळणी करून बिया स्वच्छ केल्या जातात.
९. तूस व बी वेगवेगळे करून देखील विक्री केली जाते.
इसबगोल चे अनेक फायदे आहेत. त्यामुळे जगभर याची मागणी आहे. दुसऱ्या देशात याची निर्यात केल्यास जास्त पटीने नफा होतो.