निकृष्ट सोयाबीन बियाणे: शेतकऱ्यांना पावणेचार लाख रुपये नुकसान भरपाई
सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण न झाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ३ लाख ७२ हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. राहाता व श्रीरामपूर तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी २०१६ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेले व राज्य बियाणे महामंडळाने विक्री केलेले बियाणे वापरले होते. जेएस ९३०५ या प्रकारच्या बियाणाची पेरणीनंतर समाधानकारक उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली.
महाराष्ट्रात कांदा कवडीमोल भावाने विकतोय, तर या राज्यात भाव भिडले गगनाला,असे का होते ?
महात्मा फुले कृषी विद्यापीठ व बियाणे महामंडळाच्या प्रतिनिधींनी आयोगासमोर हजर होत बियाणे दूषित नसल्याची भूमिका घेतली. समितीने सादर केलेला अहवाल हा सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे नाही तसेच बियाणांची उगवण क्षमता ही जमिनीचा पोत, हवामान, तापमान, पेरणीची पद्धती, पाणी पुरवठा, खते, कीटकनाशके यांचा वापर आदी कारणांवर अवलंबून असते, असा युक्तिवाद केला. नुकसानभरपाई देण्यास आपण बांधील नाहीत, असे म्हणणे मांडले.
कृषीमधे अवजारचं यंत्र तंत्र मंत्र – एकदा वाचाच
शेतकऱ्यांच्यावतीने अॅड. श्याम आसावा यांनी बाजू मांडली. त्यांनी विद्यापीठ व महामंडळाच्या प्रतिनिधींचे दावे खोडून काढत सर्व पुरावे सादर केले. ते आयोगाने ग्राह्य धरले. त्यामुळे शेतकरी मच्छिंद्र चौधरी, मच्छिंद्र घोलप, किशोर बनकर, बद्रीनाथ गाढवे, मंदा गाढवे, संतोष कुदळे, संभाजी कुंदे, रामनाथ भवार, दादासाहेब सोनटक्के, राजेंद्र भवार, संजय भवार, सुभाष करीर यांना ३ लाख ७२ हजार रुपये नुकसानभरपाईचे आदेश देण्यात आले. आयोगाने यात व्याज, तसेच आर्थिक व मानसिक त्रासाची भरपाई द्यावी, असे म्हटले आहे. आयोगाचे अध्यक्ष व्ही. सी. प्रेमचंदाणी, सदस्या सी. व्ही. डोंगरे व सदस्य एम. एन. ढाके यांनी आदेश पारित केले. तक्रादारांच्यावतीने अॅड. श्याम आसावा यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: ऑनलाइन नवीन अर्ज असा करा
फक्त २४ टक्केच बियाणे उगवले
समितीच्या सदस्यांनी पीडित शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करून सरासरी २४ टक्के बियाणांची उगवण झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र, त्यास नकार मिळाल्याने शेतकऱ्यांनी आयोगाकडे न्याय मागितला होता.
औरंगाबादमध्ये एकाच दिवसात २ तरुणांच्या आत्महत्या, प्रेम प्रकरणातून घेतला टोकाचा निर्णय?