PM Kisan सन्मान निधी योजनेत २ महत्वाचे बदल, होळीनंतर जमा होणार ११ वा हफ्ता
सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध नवनवीन योजना राबवत असते. अशीच एक पीएम किसान योजना राबवण्यात आली असून या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होते. आता या योजनेच्या ११ व्या हफ्त्याची वाट सर्व शेतकरी बघत आहेत. मात्र आता सरकारने यामध्ये २ महत्वाचे बदल केले आहे. नेमकं काय बदल केले आहेत तसेच ११ वा हफ्ता खात्यात कधी जमा होणार आहे हे देखील आपण जाणून घेऊयात.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दरात वाढ
पीएम सन्मान निधी योजनेत केले गेलेले बदल
पूर्वी कोणीही पंतप्रधान किसान पोर्टल वर जाऊन त्यांच्या हफ्त्याबद्दल माहिती मिळवू शकत होता. मात्र आता तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिले तुमचा मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतरच तुम्ही स्टेटस तुमच्या हफ्त्याची माहिती मिळवू शकता.
दुसरा बदल म्हणजे लाभार्थ्यांना ई- केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
कधी होणार ११ वा हफ्ता जमा ?
सरकार दर वर्षी खात्यावर ६ हजार रुपये जमा करत असून २ हजाराचा एक हफ्ता प्रमाणे वर्षातून ४ महिन्यांच्या अंतराने थेट खात्यावर जमा करते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १०वा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता केंद्र सरकार ११ व्या हप्त्यातील रक्कम होळीनंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.