ब्लॉग

पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व – शिका आणि शिकवा

Shares

नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणूचा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही.

माती परीक्षण म्हणजे शेती ची गुरूकिल्ली – एकदा वाचाच

अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणांवर स्थिर झालेला स्फुरद विरघळवून तो झाडांना उपलब्ध करून देतात. स्फुरद उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूचे दोन प्रकार आहेत.

निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो नत्राचे चक्र – वाचाल तर वाचाल

बुरशीजन्य जिवाणू

हे जिवाणू कृत्रिमरित्या ज्वारीच्या निर्जंतुक माध्यमावर मोठ्या प्रमाणात वाढवून ते त्याचप्रमाणे सूक्ष्म जिवाणू लिग्नाईट अथवा टाल्क पावडरमध्ये मिसळूनही त्याचे जिवाणूखत तयार करता येते.मायकोरायझा हे बुरशीजन्य जिवाणू असून त्याचा काही भाग मूळामध्ये व उरलेला भाग जमिनीत लांबवर पसरलेला असतो. जमिनीत पसरलेल्या धाग्यात स्फुरद व इतर सूक्ष्म अन्नघटक शोषले जातात व ते झाडाच्या मूळात आणून सोडतात. त्यामुळे मूळांची स्फुरद व इतर सूक्ष्म अन्नघटक शोषून घेण्याची कार्यक्षमता वाढते. परंतु हे जिवाणू फक्त झाडांच्या मूळावरच जिवंत राहू शकतात. कृत्रिम माध्यमावर त्यांची वाढ करता येत नाही. त्यामुळे या प्रकारचे जिवाणूखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही.

स्वातंत्र्य ते आर्थिक स्वातंत्र्य, अन् कर्जमुक्ती ते सुराज्य, यासाठी स्वतंत्र” शेतकरी मंत्रालय” व्हावे !

रोगांचे नियंत्रण करणारे जिवाणू खत मूळावर पानांवर व फळांवर विविध प्रकारचे रोग येतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. हे रोग वातावरणात व जमिनीत असणाऱ्या असंख्य रोग जिवाणूमुळे येतात. या जिवाणूवरनियंत्रण ठेवणारे ट्रायकोडर्मा अथवा सुडोमोनास फ्ल्यरोसन्ससारखे उपयुक्त जिवाणू नियमित जमिनीत वापरून त्यांची संख्या वाढविल्यास द्राक्ष बागेत विविध बुरशीजन्य व सूक्ष्म जिवाणूमुळे येणान्या संभाव्य रोगापासून बागेचे संरक्षण करता येते. त्यासाठी हे उपयुक्त जिवाणू १५ ते २० ग्रॅम या प्रमाणात सेंद्रिय खतात मिसळून खोडाभोवती टाकले तर सेंद्रिय खतावर जमिनीत त्यांची वाढ होऊन बागेतील रोग जिवाणूचे नियंत्रण करून बाग रोगमुक्त ठेवतात.

शेती नविन पद्धतीने केले तरच फायद्याची….. वाचाल तर वाचाल

सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करणारे जिवाणू खतवर निर्देश केलेल्या जिवाणू व्यतिरिक्त हे जिवाणू सुद्धा पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. रोपे लागवडीसाठी आपण खड्डे तयार करतो व ते खड्डे भरताना पालापाचोळा व कंपोस्ट खत यांचा भरपूर वापर करतो. पालापाचोळा जलद कुजून त्यातील अन्नद्रव्ये लावलेल्या रोपाला त्वरित मिळण्यासाठी या जिवाणू खताचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच पीकांना वाढ जेव्हा आवश्यक असते व झाडांना अन्नद्रव्यांची उपलब्धता ज्या काळात जलद हवी असते अशा वेळी आपण झाडाभोवती जमिनीची मशागत करून सेंद्रिय खते देतो. या सेंद्रिय खतांचे जलद विघटन होण्यासाठी व अन्नद्रव्ये झाडांना जलद मिळण्यासाठी कंपोस्ट खताबरोबर हे जिवाणूखत वापरणे आवश्यक आहे.

मातीची जैविक क्षमता टिकवणे आज का महत्त्वाचे – एकदा वाचाच

कंपोस्ट खतातून प्रत्येक झाडाला १५ ते २० ग्रॅम जिवाणूखत मिळेल या प्रमाणात वापरणे परिणामकारक ठरते.झाडांना होणारा अन्नद्रव्यांचा पुरवठा जिवाणूमुळे संतुलित केला जातो. जमिनीत जर वरीलप्रमाणे निर्देश केलेले सर्व उपयुक्त जिवाणू वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर द्राक्षवेलींची वाढ निरोगी होऊन चांगल्या प्रतीचे घड भरपूर प्रमाणात येतील. जमिनीत असंख्य प्रकारचे उपयुक्त व रोग निर्माण करणारे कार्यक्षम व अकार्यक्षम जिवाणू असतात परंतु ते आपल्या डोळ्यालाही न दिसतील इतके सूक्ष्म असतात त्यामुळे त्यांचे वास्तव्य आपणाला समजून येत नाही.

वनस्पतीच्या अन्नाचे व्यवस्थापन सुक्ष्मजीव‌ करतात……

आपण जर वरील उपयुक्त व जिवाणू जिवाणू खताद्वारे बागेमध्ये प्रत्येक वर्षी नियमित वापरले तर रोग निर्माण करणारे व अकार्यक्षम जिवाणूंची संख्या आपोआप कमी होऊन उपयुक्त व कार्यक्षम जिवाणूंची संख्या वाढेल. नैसर्गिक समतोल राखला जाऊन झाडांना अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा झाल्याने झाडे सुदृढ व फलदायी ठरतील. जिवाणूखतांचा वापर केल्यास आपणास रासायनिक खताच्या मात्रा व बुरशीनाशके कमी वापरून भरपूर आणि निरोगी उत्पादन मिळविता येईल. जिवाणूखतामुळे रासायनिक खतांच्या वापरावरील खर्चात बचत होऊन आपणास पिक उत्पादन किफायतशीर घेता येईल…….

धन्यवाद

शिका आणि शिकवा

शेत बलवान तर शेतकरी धनवान

विचारांची दिशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे

युवा शेतकरी व सेंद्रिय शेती अभ्यासक

milindgode111@gmail.com

9423361185

आधार कार्डमधील तपशील किती वेळा बदलता येतो? संपूर्ण माहिती जाणून घ्या!

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *