कापसाने केले १० हजार ६०० पार तर लवकरच ११ हजारांचा पल्ला गाठणार, जाणून घ्या आजचे दर
यंदा सर्वच शेतमालाच्या दरामध्ये कमालीची चढ उतार होत आहे. मात्र कापसाचे दर हे सुरुवातीपासूनच चांगले होते. मध्यंतरी दरामध्ये थोडी घट झाली होती मात्र नंतर कापसाला विक्रमी दर मिळाला होता.
शेतकऱ्यांनी कापसाच्या मागणीपेक्षा अधिकची विक्री न केल्यामुळे कापसाचा दर अजूनही टिकून आहे. त्यात रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम कापसाच्या दरावर होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे असले तरी कापसाच्या दराने १० हजारांचा आकडा पार केला आहे.
कापसाचे आजचे दर
मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी बाजारपेठेमध्ये किमान दर हा १० हजार ५५० तर कमाल दर १० हजार ६०० असा मिळत आहे. शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून साठवणूक केलेला कापूस आता विक्रीस काढला आहे.
कापसाला विक्रमी दर मात्र आवक मध्ये घट
व्यपाऱ्यांनी प्रथमच शेतकऱ्यांच्या दारी जाऊन कापसाची खरेदी केली आहे. तर जागोजागी कापूस खरेदी केंद्र देखील उभारण्यात आले होते. कापूस आता शेवटच्या टप्यात असला तरी मुख्य बाजारपेठेत दिवसाला ४०० क्विंटल कापसाची आवक सुरु आहे.
मागील काही दिवसापासून साठवणूक केलेला कापूस आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढला आहे. तर सध्या कापसाच्या दरात कमालीची वाढ होत असून अजून वाढ होण्याची शक्यता आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
फरदडचे उत्पादन
कापसाचा मुख्य हंगाम संपला तरी फरदडच्या माध्यमातून शेतकरी कापूस उत्पादन घेण्याची परंपरा कायम आहे. यामुळे नुकसान होते माहिती असून देखील शेतकरी यंदा विक्रमी दर मिळत असल्यामुळे तसेच त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे कापसाचे उत्पादन घेण्याचे धाडस करत आहेत. तसेच एक मुख्य कारण म्हणजे कापसाचे दर हे स्थिर आहेत.
यंदा कापसाला विक्रमी दर
कापसाबरोबर इतर पिकांचेही खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र इतर शेतमालाच्या तुलनेत कापसाला सुरुवातीपासूनच चांगला दर होता . एवढेच काय तर मागील ५० वर्षातील विक्रमी दर कापसाला मिळाला आहे.
यंदा उत्पादनात घट झाली मात्र याचा दरावर काही एक परिणाम झाला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा (Read This ) हायब्रीड कारले लागवडीतून घ्या भरगोस उत्पन्न