इतर बातम्या

आल्यापासून सुंठ निर्मिती कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shares

दररोजचा सकाळचा चहा म्हंटले की आल्याची आठवण येतेच तर कोणतीही मसाला भाजी म्हंटले तर सुकलेली अद्रक म्हणजेच सुंठ आठवते. आपण आपल्या रोजच्या आहारात आल्याचा वापर करत असतो.
आल्यापासून अनेक पदार्थ बनवले जात असून आल्यामुळे पदार्थांना चव येते. सुकलेल्या आल्याचा म्हणजेच सुंठाचा वापर लोणचे, सरबत तसेच खोकला झाला असल्यास केला जातो तर आपण आज आल्यापासून सुंठ निर्मिती कशी करावी याची माहिती जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा (Read This ) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

सुंठ तयार कारण्यासाठी कशी अद्रक निवडावीत?

सुंठ तयार करायची असेल तर आले परिपकव झाल्यानंतर त्याची काढणी करावी.
आले पूर्ण वाढलेले, निरोगी असावे.
सुंठासाठी वापरायचे आले अधिक तंतुमय नसावेयामुळे उत्तम प्रतीची सुंठ तयार होते आणि नफा देखील चांगलाच होतो.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

सुंठ तयार करण्याच्या पद्धती
सुंठ तयार करण्याच्या २ पद्धतींची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत

मलबार पद्धत

  • मलबार पद्धतीमध्ये स्वच्छ केलेले आले सुमारे ८-१० तास पाण्यात ठेवले जाते.
  • त्यानंतर त्याची साले काढून २% चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवले जाते.
  • त्यांना द्रावणातून काढून बंद खोलीत ठेवले जाते.
  • आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी देण्यात येते. यात बंद खोलीत गंधक जळत ठेवले जाते.
  • त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात.
  • ही पद्धती तीन वेळा करावी लागते, यामुळे आल्याच्या कंदांस पांढरा रंग प्राप्त होतो.
  • प्रक्रिया केलेल्या ह्या आल्यांना सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते.
  • हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये

सुंठ सोडा व खास मिश्रण पद्धत

  • सुंठ सोडा व खास मिश्रण पद्धतीमध्ये आले स्वच्छ करून घावे आणि ८-१० तास पाण्यात भिजत ठेऊन त्याची साल काढून घ्यावी.
  • त्यानंतर १.५ X २ फूट आकाराच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे.
  • तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईडची २० टक्के, २५ टक्के आणि ५० टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत.
  • उकळलेल्या या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला जाळीचा पिंजरा २० टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, २५ टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि ५० टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा.
  • त्यानंतर पिंजऱ्यातील आले ४ टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे.
  • या प्रक्रियेनंतर ते चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे.
  • राहिलेली साल चोळून काढावी.

अश्याप्रकारे तुम्ही दोन्ही पद्धतीचा वापर करून उत्तम प्रकारची सुंठ तयार करू शकता.

टीप- कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ञाचे माहिती मार्गदर्शन घ्यावे. जेणेकरून तुम्हाला अधिक उत्पन्न मिळवता येईल.

हे ही वाचा (Read This ) मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये, संपूर्ण माहिती

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *