शेतकऱ्यांना अजून किती रडवणार कांदा, जाणून घ्या आजचे दर
मागील २ महिन्यापासून कांद्याच्या दरामध्ये चढ उतार होत होती. तर मध्यंतरी दरात स्थिरता दिसत होती. मात्र आता कांद्याचा दर हा ३ हजार ५०० वरून थेट १ हजारांवर आला होता. आता तर हे दर ८०० रुपयांवर येऊन पोहचले आहे. भविष्यामध्ये हे दर अजून कमी होतील की काय अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे दर १२०० रुपये प्रति क्विंटल असे होते महिन्याच्या शेवटी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून केवळ ८०० रुपये प्रति क्विंटल दर झाला आहे.
कांद्याचे आजचे दर
खरीप हंगामातील लाल कांदा अंतिम टप्यात आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरू झाली असून जानेवारी महिन्यापेक्षा आवक कमी असताना देखील दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याची मागणी नसल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पुण्यातील खेड, सोलापूर आणि लासलगाव या मार्केटमध्ये देखील सारखीच परिस्तिथी आहे.
कांद्याची आवक वाढली
थोडा तरी चांगला दर मिळावा यासाठी शेतकरी रात्रंदिवस एक करून कांदा काढणी, छाटणीआणि लगेचच विक्री करत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये रात्रीतून ३०० ते ४०० ट्रक मधून कांद्याची आवक सुरु आहे.
ढगाळ वातावरण तसेच अवकाळी मुळे कांद्याची आवक कमी झाली होती. मात्र आता पुन्हा आवक वाढली आहे.
कांदा लागवडीच्या खर्चाच्या अगदी निम्मी किंमत कांद्यास मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
शेतकऱ्यांचे अर्थकारण हुकले
यंदा कोरोना मुळे चांगले उत्पादन झालेल्या शेतमालाची विक्री झाली नाही तर नंतर खरीप हंगामात अवकाळी , अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रशिया युक्रेन युद्धामुळे शेतमालाच्या किमतींमध्ये सतत चढ उतार होत असून सर्वच पिकाचे गणित हुकले. त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाला आहे.