IAS बनणारा झाला शेतकरी, संत्रीचे ३ एकरात घेतले ९ लाखाचे उत्पन्न
शेती हा व्यवसाय बेभरोसाचा असून त्यामधून जास्त उत्पन्न मिळत नाही असा समज आजकालच्या युवकांना आहे. त्यामुळे शेतकरी पुत्र आता शेती न करता नोकरीच्या मागे लागतात. मात्र वाशीम मधील वैभवने युवकांचा हा गैरसमज दूर केला आहे. त्याने आपल्या शेतामध्ये संत्रा बाग फुलवून त्यातून तब्बल ९ लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
विदर्भ म्हंटले तर आपल्यासमोर नापीक जमीन, शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा असे चित्र समोर येते. मात्र आता चित्र बदलले असून विदर्भातील शेतकरी आता विविध नवनवीन प्रयोग करून शेती करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत आहेत. वाशिममधील एका शेतकरी पुत्राने नौकरीच्या मागे न लागता संत्रा शेती करून त्यातून नफा मिळवला आहे.
तीन एकरात संत्रा शेती करून घेतले ९ लाख उत्पन्न
वाशिममधील अडोळी गावातील विलास इढोळे नावाच्या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जीत सात एकर शेती आहे. यापैकी तीन एकर शेतीमध्ये आठ वर्षापूर्वी संत्रा लागवड केली. पारंपारिक पद्धतीने संत्र्याचे ते उत्पन्न घ्यायचे. यातून त्यांना वार्षिक चार लाखापर्यंत उत्पन्न व्हायचे. मात्र, त्यांचा मुलगा वैभव इढोळे याने शेती करायला सुरूवात केल्यापासून त्यांचे चार लाखांचे उत्पन्न नऊ लाखांवर गेले आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने चार लाखांचे उत्पन्न नऊ लाखांवर नेले. यापुढे अधिक मेहनत करून संत्राचे उत्पन्न हे १५ ते २० लाखापर्यंत नेणार आहे, असे वैभवने सांगितले.
संत्रा शेतीमध्ये काही प्रयोग करून मिळवले यश
गेल्या दोन वर्षापासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी किंवा रोजगासाठी गेलेल्या अनेकांना आपले गाव गाठावे लागले होते. यात विलास इढोळे यांचा मुलगा वैभव इढोळे यालासुद्धा आपल्या गावी परत याव लागले. गावाकडे आलेल्या वैभवने आपल्या वडिलांना शेतीकामात मदत कसण्यास सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा उपयोग करत विकासने इंटरनेटवरून संत्रा पिकाबाबत शास्त्रशुद्ध माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्याला वेळोवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी कार्यालय वाशीम तसेच पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र करडा येथील अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहिले. त्यामुळे संत्रा शेतीमध्ये काही प्रयोग करून त्याने हे यश मिळवले आहे.