पिकपाणी

गुणकारी मेथीची लागवड पद्धत

Shares

लहानांपासून मोठ्या पर्यंतची नावडती पण गुणधर्मांनी संपूर्ण असणारी मेथी लागवडीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. मेथीचा वापर पाने , बिया अश्या दोन्ही स्वरूपात केला जातो. मेथीच्या पानांची भाजी बनवली जाते तर मेथीच्या दाण्यांचा उपयोग मसाला म्हणून केला जातो. मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी आहे. मेथीला कडवट चव जरी असली तरी त्याचा वापर विविध पदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. मेथीस बाजारपेठेत मोठ्या संख्येने मागणी असते. याचा वापर लोणच बनवण्यासाठी , तेलासाठी देखील जातो. मेथी मध्ये अ , ब , क जीवनसत्वे, लोह , पोटॅशिअम , मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. पंचक्रियेची कार्यक्षमता वाढवण्याचे काम मेथी करते.

जमीन व हवामान –
१. जुन्या मुरलेल्या बागायती जमिनीत मेथीचे पीक उत्तम येते.
२. मध्यम खोलीची , कसदार , पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमीन निवडावी.
३. मेथी पिकाची लागवड थंड हवामानात तसेच हवेत आद्रता असतांना सूर्यप्रकाशात करणे गरजेचे आहे.
४. मेथीचे पीक उन्हाळ्यात देखील घेता येते.

लागवड पद्धत –
१. मेथी पिकाची लागवड करतांना जमीन नांगरु नये. जमीन नांगरल्यास बी खोल जाऊन उगवण होत नाही.
२. जमिनीची फणणी करून चांगली मशागत करावी.
३. सेंद्रिय खत टाकून सरे ओढावेत.
४. साधारणतः कडक उन्हाळा असला तरी ४ ते ५ दिवसात उगवून येते.
५. प्रति एकरी ८० किलो बियाणे लागतात.
६. मेथीची लागवड भाजीसाठी करत असाल तर लांब सारे पाडावे.

काढणी-
१. मेथीच्या जातीनुसार ३५ ते ४० दिवसात काढणी करावी.
२. या पिकाची काढणी फुलोऱ्यावर येण्या अगोदर करावी.

उत्पादन-
१. पावसाळी हंगामात मेथीच्या १०० गड्ड्या १ गुंठ्यात निघतात.
२. उन्हाळी हंगामात मेथीच्या १५० ते २०० गड्ड्या निघतात.

मेथी आरोग्यदृष्ट्या गुणकारी असल्याने बाजारपेठेत मेथीला जास्त मागणी आहे.

Shares