हरभऱ्याला हमीभावाचा आधार, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण?
हमीभाव केंद्र उभारण्याचा मुख्य उद्देश शेतीमालास किमान दर मिळावा असा असतो. सध्या नाफेडच्या माध्यमातून खरिपातील तूर आणि रब्बीतील हरभरा यांची खरेदी केली जात आहे. परंतु हमीभावापेक्षा बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमी आहे. तरीही शेतकरी खुल्या बाजारपेठेत हरभरा विक्री करण्यावर जास्त जोर देत आहेत.
मागील ३ महिन्याच्या काळात फक्त ३ लाख क्विंटल हरभरा खरेदी केलेली नोंद औरंगाबाद विभागात झाली आहे. रबी हंगामात हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा होता शिवाय उत्पादनही चांगले झाले आहे. मात्र, कृषी विभागाने उत्पादकता कमी दाखवल्याने खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीस अडचणी येत आहेत.
हे ही वाचा (Read This) केळीच्या फांद्यापासून सेंद्रिय खत बनवून नफा कमवू शकतात शेतकरी
खरेदी केंद्र आणि बाजारपेठेतील किमतींमध्ये तफावत
सध्या नाफेडने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० हा हमीभाव ठरवून दिला आहे. तर खुल्या बाजारपेठेतील दरात काहीशी वाढ होऊन ४ हजार ८०० रुपयांपर्यंत दर आहेत. असे असले तरी चक्क ४०० रुपयांचा फरक आहे. असे असतानाही खरेदी केंद्रावर कमी आणि खुल्या बाजारात अधिकची आवक असते. त्यामुळे आता हमीभाव केंद्राचा उद्देश्य सध्या होतो की नाही हे पाहण्यासारखे आहे.
हे ही वाचा (Read This) मराठवाड्यात हळदीला मिळतोय विक्रमी दर, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांचा पीक काढणीसाठी जोर
नेमकी अडचण कुठे येत आहे?
कृषी विभागाकडून प्रत्येक पिकाची उत्पादकता ठरवण्यात येते. त्यानुसार खरेदी केंद्रावर शेतमालाची खरेदी करण्यात येते. जर कृषी विभागाने ३ क्विंटल उत्पादकता जाहीर केली तर तितकाच माल खरेदी केंद्रावर घेतला जातो.
औरंगाबाद जिल्ह्यातील हरभऱ्याची उत्पादकता ही ५ क्विंटल ८० किलो एवढी दर्शवली आहे. प्रत्यक्षात हे उत्पादन एका एकरामध्ये होते असा दावा शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे उर्वरित पिकाचे करायचे काय असा सवाल आहे. तर अशीच अडचण अनेक जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात विक्री करत आहेत.
हे ही वाचा (Read This) आता नोकरी १२ तासांची, पगार पण कमी, पीएफ वाढणार- १ जुलैपासून मोदी सरकार लागू करणार नवे नियम ?
हमीभावाचा अनेक शेतकऱ्यांना मिळाला आधार
आता पर्यंत नाफेडने खरेदी केलेल्या मालाचे वेळेत पैसे मिळत नव्हते. तर माल खरेदी करून देखील महिने महिने पैसे दिले जात नव्हते. मात्र आता हे चित्र बदललेले दिसत आहे . माल खरेदी केल्यानंतर १० ते १२ दिवसातच ऐसे शेतकरयांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यामुळे नाईक शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय