या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा
शेतकरी सध्या उत्पादन वाढावे यासाठी विविध प्रयोग करत आहे अनेक शेतकरी तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असणाऱ्या पिकांची लागवड करत आहेत. आपण आज अश्याच एका विदेशी वंशाच्या वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत. ती वनस्पती म्हणजे जोजोबा वनस्पती.
मागील काही वर्षांपासून जोजोबाची शेती भारतामध्ये केली जात असून राजस्थानमध्ये याची लागवड केली जात आहे. या वनस्पतीला जास्त पाण्याची गरज नसते. भारतामध्ये सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, राई, मोहरी यांच्यापासून तेल काढले जाते तसेच जोजोबा हे एक परदेशी तेलबियांचे पीक असून ऍरिझोना, मेक्सिको, कॅलिफोर्निया येथे मागील कित्तेक वर्षांपासून उत्पादन घेतले जाते.
ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज
जोजोबा हा एक भाजीचा प्रकार असून याच्या बियांपासून ४५ ते ५५ % तेल काढले जाते. तर इस्त्राईलमध्ये याच्य़ा लागवडीला प्रारंभ झाला होता. याच देशामध्ये सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. सुरवातीला लोक व्हेल माशाची शिकार करून तेल बाहेर काढत असत, ज्यामुळे व्हेलची प्रजाती नष्ट होऊ शकते. त्यामुळेच त्याच्या शिकारीवर बंदी घातली गेली, मग त्यावर पर्याय म्हणून शोध सुरु असतांना जोजोबा वनस्पती समोर आली.
भारतामध्ये केली जात आहे जोजोबाची लागवड
भारतामध्ये जोजोबाची लागवड करण्यास सुरुवात झाली असून राजस्थान येथे केली जात आहे. येथील शेतकरीही जोजोबा निर्यात करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. जोजोबाच्या गुणांमुळे त्याला परदेशात प्रचंड मागणी आहे.
अल्पाधीतच भारतामधील जोजोबाला मागणी वाढत आहे.जोजोबा तेलाची किंमत जास्त असल्याने कॉस्मेटिक कंपन्या सध्या उत्पादनांमध्ये त्याचा वापर करत आहेत. जोजोबा तेल गंधहीन आणि उत्तम प्रतीचे असते. याचे महत्व कळावे म्हणून राजस्थान सरकारने असोसिएशन ऑफ राजस्थान जेजोबा वृक्षारोपण संशोधन प्रकल्पाची स्थापना केली आहे.
भारतामधून जोजोबाची निर्यात
जोजोबाचे तेल फिल्टरने गाळले जाते आणि फिल्टर केलेले तेल स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांमध्ये गोळा केले जाते. गरजेनुसार छोटे-मोठे पॅकिंग करून बाजारात पाठवले जाते. तर गेल्या काही वर्षांत जोजोबाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढीव उत्पादनामुळे भारतामधून त्याची निर्यात इतर देशांनाही होत आहे. हे कमी पाण्यात सहजपणे वाढवता येते असून वाढती मागणी लक्षात घेता जोजोबाचे अनेक प्रोसेसिंग युनिटही सुरू करण्यात येत आहे. व्यवसायिक दृष्टिकोनातून जोजोबाकडे पहिले तर यामधून नक्की फायदा होणार आहे.