हायब्रीड कारले लागवडीतून घ्या भरगोस उत्पन्न
अनेक शेतकऱ्यांचा कल हा आता भाजीपाला लागवडीकडे जास्त वळत आहे. याचे कारण म्हणजे भाजीपाला पीक हे कमी वेळात जास्त नफा मिळवून देते. आपण आज अश्याच एका हायब्रीड भाजीपाला पिकाची माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही जर लागवडीसाठी भाजीपाला पिकाच्या शोधात असाल तर तुम्ही हायब्रीड कारल्याची लागवड करून अधिकचे उत्पन्न मिळवू शकता. हायब्रीड कारल्याची वाढ ही लवकर होते. तर यांच्या प्रजाती लवकर वाढून चांगले उत्पादन येते.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
काय आहे हायब्रीड कारले ?
कारल्याच्या देशी आणि संकरित ( हायब्रीड) अश्या दोन जाती आहेत. यांमध्ये हायब्रीड कारल्याची वाढ ही लवकर होते. हे कारले काही काळातच परिपक्व होतात. सामान्य कारल्याच्या तुलनेत यांचा आकार मोठा असतो.
हायब्रीड कारल्यास बाजारामध्ये उत्तम दर देखील मिळतो. त्यामुळे अनेक शेतकरी हे हायब्रीड कारल्याची लागवड करतात. हायब्रीड कारल्याच्या बिया देशी बियाण्यापेक्षा थोडे महाग असतात.
जमीन आणि हवामान
- उबदार वातावरणात कारल्याचे पीक चांगले येते.
- कारले पिकाची लागवड उन्हाळा आणि पावसाळा अश्या दोन्ही ऋतू मध्ये करता यते.
- २५ अंश सेंटीग्रेड ते ३५ अंश सेंटीग्रेड तापमानात पिकाची उत्तम वाढ होते तर फुल आणि फळधारणा चांगली होते.
- वालुकामय चिकणमाती मध्ये कारल्याचे पीक उत्तम येते.
- पाण्याचा चांगला निचरा करणारी जमीन असावी.
बियाणे
- प्रति एकर साठी ५०० ग्रॅम कारल्याचे बियाणे पुरेसे आहेत.
- बियाणे लावण्यापूर्वी बाविस्टीनच्या द्रावणात १८ ते २४ तास भिजवावेत.
- पेरणी करण्यापूर्वी या बिया सावलीत वाळव्याव्यात.
हे ही वाचा (Read This ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान
लागवड आणि व्यवस्थापन
- कारले पिकाची लागवड ही वर्षातून २ वेळेस करता येते.
- हिवाळ्यातील कारल्याच्या जातींची पेरणी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करता येते, मे-जूनमध्ये उत्पादन मिळते.
- उन्हाळी वाणांची पेरणी पावसाळ्यात जून-जुलैमध्ये केली जाते, ज्यांचे उत्पादन डिसेंबरपर्यंत मिळते.
- कारल्याच्या बिया लावण्यापूर्वी २५-३० दिवस आधी एक हेक्टर शेतात २५-३० टन शेणखत किंवा कंपोस्ट मिसळावे.
- पेरणीपूर्वी नाल्यांमध्ये 50 किलो डीएपी, 50 किलो म्युरेट ऑफ पोटास प्रति हेक्टरी (500 ग्रॅम प्रति थमला) मिसळावे.
- 30 किलो युरिया पेरणीनंतर 20-25 दिवसांनी आणि 30 किलो युरिया 50-55 दिवसांनी फुले व फळधारणेच्या वेळी द्यावे.
- शेतामध्ये संध्याकाळी थोडा ओलावा असतांना युरियाचा वापर करावा.
- पावसात कारले लावताना त्यात कमी पाणी दिले तरी चालते, पण उन्हाळ्यात वेळोवेळी पाणी देणे गरजेचे आहे.
- शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- शेतात ओलावा राहील मात्र पाणी साचून राहणार नाही अश्या पद्धतीने नाले तयार करावेत.
आता सर्वांनाच भाजीपाल्याचे महत्व कळल्यामुळे तसेच कारले अनेक आजारांवर औषध म्हणून काम करत असल्यामुळे कडू असले तरी अजून जण आपल्या आहारात याचा समावेश करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत यास मोठी मागणी होत आहे.
हे ही वाचा (Read This हा ज्यूस ३ तासात डायबेटीस रुग्णांची शुगर करेल कंट्रोल, तज्ज्ञांचा सल्ला