इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

उद्योगासाठी मिळणार ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज, असा करा अर्ज

Shares

राज्य शासन शहरी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध योजना, कार्यक्रम राबवत असते. असाच एक स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला काळानुरुप वाव देणारा सर्वसमावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे.

गेल्या दोन वर्षापासुन या योजनेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून मोठया प्रमाणात कर्ज प्रकरणे पोर्टलवर दाखल होत आहे. विविध बँक शाखांच्या माध्यमातून कर्जप्रकरणांना मंजूरी मिळत आहे.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

किती मिळणार अनुदान?

कृषीपुरक उद्योग आणि व्यवसायासाठी 10 लाख रुपये तसेच उत्पादन प्रकारच्या प्रकल्पांसाठी 50 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध असणार आहे. एकुण प्रकल्प किंमतीच्या शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पुर्ण व जास्तीत जास्त 45 वर्ष असावे. 10 लाख रुपयांवरील प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 7 वी उत्तीर्ण व 25 लाख रुपयावरील प्रकल्पासाठी इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा

अर्ज कुठे करावा?

ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असून उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरून जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज दाखल करावा.

अधिकृत संकेतस्थळ

https://maha-cmegp.gov.in/homepage

हे ही वाचा (Read This कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *