पिकपाणी

गवारच्या अधिक उत्पादनासाठी करा या वाणांची लागवड

Shares

गवार पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती म्हणून फेरपालट करण्यासाठी आंतरपीक म्हणून केली जाते. जमिनीतील नत्राचा साठा गवार पिकामुळे वाढतो. भाजीपाला पिकांमधील गवार हे एक महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. गवार पिकामध्ये अ .ब जीवनसत्वे, चुना, लोह, प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
गवारीच्या काही सुधारित जातींची लागवड करून अधिक उत्पहदन मिळवता येते. आपण गवारच्या सुधारित वाणांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

गवारचे सुधारित वाण –
शरद बहार –
१. हे वाण अतिशय उत्कृष्ट असून ही झाडे बुटकी असतात.
२. या जातीच्या शेंगा १० ते १२ सेमी लांब असतात.
३. या शेंगाचा रंग गडद हिरवा असतो.
४. या जातीची लागवड केल्यानंतर ६० दिवसांनी या शेंगा तोडणी योग्य असते.
५. या जातीच्या शेंगाची तोडणी ३ ते ४ दिवसाच्या अंतराने करावी.
६. या जातीचे हेक्टरी उत्पादन ९ टन पर्यंत मिळते.

पुसा नव बहार –
१. गवारीची ही जात पुसा सदाबहार व पुसा मोसमीया या २ जातीच्या संकरातून विकसित केली गेली आहे.
२. या जातीची लागवड खरीप तसेच उन्हाळी हंगामात केल्यास जास्त नफा होतो.

पुसा सदाबहार –
१. राजस्थान येथे निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली जात म्हणजेच पुसा सदाबहार होय.
२. या जातीच्या शेंगा सरळ वाढतात तसेच जास्त उत्पादन मिळवून देतात.
३. या जातीच्या पिकांची वाढ उन्हाळी तसेच खरीप हंगामात जास्त उत्तम होते.
४. या जातीच्या शेंगांची तोडणी उन्हाळ्यात ४५ दिवसांनी करावी.
५. या जातीच्या शेंगांची तोडणी हिवाळ्यात ५५ दिवसांनी करावी.

पुसा मोसमी –
१. पावसाळी हंगामात गवारीचे पीक घ्यायचे असल्यास ही जात अत्यंत उत्तम ठरते.
२. या जातीच्या झाडांना अनेक फांद्या येतात.
३. या जातीच्या शेंगा १० ते १५ सेमी लांब असतात तर यांचा रंग हिरवा असतो.
४. लागवड केल्यानंतर ६५ ते ८० दिवसात या शेंगा तोडणीस तयार होतात.

वरीलप्रमाणे गवारीच्या सुधारित वाणांची लागवड केल्यास जास्त उत्पन्न मिळते.

Shares