तुरीला पहिल्यांदाच हमीभावापेक्षा जास्त दर
यंदा सोयाबीन, कापूस यांच्या दरात सुरुवातीपासूनच चढ उतार होत आहे. तर आता यामध्ये तुरीची भर पडली आहे. सुरुवातीला तुरीला ५ हजार ८०० पर्यंतचा दर मिळत होता. आता या दरामध्ये दीड महिन्यातच ७०० रुपयांची वाढ झाली आहे.
तुर हमीभाव केंद्रावर तुरीस ६ हजार ३०० चा दर ठरवून दिला असून हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल कमी असला तरी हमीभाव केंद्र सुरु होताच बाजारपेठेतील तुरीचे दर वाढले होते.
आता हमीभावापेक्षा अधिकच दर बाजारपेठेमध्ये मिळत असल्यामुळे शेतकरी बाजारपेठेला पहिले प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे सोयाबीनच्या आणि कापसाच्या दरामध्ये स्थिरता दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This) कांद्याच्या दरात स्थिरता, जाणून घ्या आजचे दर
हमीभाव केंद्रावर शुकशुकाट …
नाफेडच्या वतीने तूर हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले असून तेथे तूर विक्रीसाठी काही नियम आणि अटी लागू केल्या गेल्यामुळे तसेच महिन्याभरानंतर खात्यावर पैसे जमा होत असल्यामुळे शेतकरी खुल्या बाजारातच तूर विक्री करण्यास प्राधान्य देत आहे.
आता शेतकरी खुल्या बाजाराला अधिक प्राधान्य देत असल्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये तुरीची आवक वाढली आहे. तर तुरीस खुल्या बाजारपेठेत ६ हजार ५०० असा दर मिळत आहे. हमीभाव केंद्रापेक्षा अधिक दर खुल्या बाजारपेठेत मिळत असल्यामूळे हमीभाव केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे.
आवक मध्ये वाढ
मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होत होती. मात्र आता हे दर ७ हजार ३०० वर स्थिर झाले असले तरी सध्या हंगामातील चांगला दर मानला जात आहे. मंगळवारी सोयाबीनची आवक ही ३४ हजार पोते , तुरीची २० हजार पोते तर हरभऱ्याची ४० हजार पोते आवक झाली आहे.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !