राज्यात बंदीनंतर पहिली बैलगाडा शर्यत पार, पहिले बक्षीस १ लाख रुपये
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर ( Bullock Cart Racing ) तब्बल ७ वर्षांनी बंदी उठवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्यात बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी कोरोनामुळे( Corona) ही शर्यत रद्द करण्यात आली असली तरी राज्यातली पहिली बैलगाडी शर्यत सांगलीमधील नांगोळे गावात अगदी जोशात पार पडली आहे. या शर्यतीनंतर गावात सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शर्यतीवरील निर्बंध उठवल्यानंतरची ही पहिली बैलगाडी शर्यत होती.
असे केले जोरात बैलगाड्यांच्या स्वागत
नांगोळे गावात सकाळी सूर्याचे आगमन होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी दारामध्ये गुढ्या उभारून शर्यतीसाठी येणाऱ्या बैलजोड्यांचे स्वागत (Welcome) करण्यात आले. आलेल्या बैलगाड्यांची पूजा देखील करण्यात आली. एक्दम थाटामाटात बैलगाड्यांच्या स्वागत करण्यात आले.
हे ही वाचा (Read This ) युवा शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून या व्यवसायासाठी 50% अनुदान.
बैलगाडी शर्यत प्रेमींनी ऑनलाईन पाहिली शर्यत ?
कोरोनाचा पुन्हा वाढत प्रादुर्भाव पाहता बैलगाडी शर्यतीवर काही निर्बंध लावण्यात आले होते. बैलगाडी शर्यत प्रेमींना पहिलेच आवाहन देण्यात आले होते की मैदानावर कोणीही गर्दी न करता ऑनलाईन(Online) शर्यत पाहावी. तिथे प्रत्यक्षात केवळ ५० लोक हजार राहू शकतात असे आवाहन करूनही शर्यतीच्यावेळेस अनेकांनी गर्दी केली होती.
विजेत्याने मिळवले लाखोंचे बक्षीस
या बैलगाडी शर्यतीमध्ये ४९ बैलजोडींनी नोंदणी केली होती. ही शर्यत ३ फेऱ्यांमध्ये पार पडली असून पहिले बक्षीस तब्बल १ लाख , दुसरे बक्षिस ७५ हजार तर तिसरे बक्षीस ५० हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे.