शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त शेतमालाचाच आधार (Support) असतो. केंद्र तसेच राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांसाठी विविध योजना, ( Scheme) उपक्रम राबवत असले तरी त्यांना शेतमाल व्यतिरिक्त कमवण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी तसेच त्यांचा विकास व्हावा यासाठी पीएम मानधन योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमध्ये कोट्यावधी शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला ३ हजार रुपये म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपये पेन्शन (Farmers Pension) स्वरूपात देण्यात येणार आहे. या योजेचा लाभ देशातील कोट्यवधी शेतकरी घेऊ शकतात.
हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय
पेन्शन चा लाभ घेण्यासाठी काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत
पीएम किसान मानधन योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होऊन पेन्शन चा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना काही अटी व नियमांचे पालन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर महिन्याला ३ हजार रुपये जमा होणार असले तरी त्यांना त्याआधी प्रीमियम अदा करावा लागणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचे वय हे १८ ते ४० दरम्यान असावे लागणार असून त्यांना या योजनेत दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करावे लागणार आहे. शेतकऱ्यांचे ६० वर्षे वय झाल्यानंतर त्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो हा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखों रुपये
अर्ज कसा करावा ?
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना सर्वप्रथम त्यांच्या जवळच्या सीएससी (Common Service Center) मध्ये जावे लागणार आहे. तिथे सर्व कागदपत्रे सादर करून बँकेची माहिती द्यावी लागणार आहे. सीएससी तुमच्या आधारकार्ड ला अर्ज लिंक करून तुम्हाला किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर पुरवला जाईल. त्यानंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
अधिकृत वेबसाइट
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठीच्या १४ अंकाचा युनिक लँड आयडीची चाकण पासून सुरुवात