इतर बातम्या

शेतकरी संघटना आक्रमक, महावितरणच्या कार्यालयात सोडला साप

Shares

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सुरळीत विजेची गरज असते. जेणेकरून त्यांना पिकांना वेळोवेळी पाणी देता येईल तसेच शेतीचे इतर कामे करता येईल.
शेतकऱ्यांना दिवस १० तास वीज मिळावी यासाठी महावितरण कार्यालयासमोर मागील ५ दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Swabhimani Shetkari Sanghatna) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाकडं महावितरणच्या अधिकाऱ्यानं दुर्लक्ष केले असता एका अज्ञात शेतकऱ्यांनी गुरुवारी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय पेटवलं होत. तर आज इचलकरंजी मधील महावितरण अधिकाराच्या टेबलावर साप सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महावितरण कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेतीसाठी ग्रामीण भागात रात्री वीज पुरवली जाते तर आम्हाला दिवसा वीज मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र महावितरण अधिकाऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्यास मनाई केली. त्यामुळे टेबलवर साप सोडला असण्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभर आंदोलन सुरु …

शेतीसाठी दिवसा १० तास पूर्ण दाबानं वीजपुरवठा करावा आणि विज तोडणी थांबवावी. तसेच सक्तिचे विजबिल आणि शेतकऱ्यावर जाचकपणे लावलेले वीजबील तात्काळ रद्य करावे, यासह विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते करत असून या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून राज्यभर आंदोलन करीत आहेत.

रात्रीचा वीजपुरवठा जीव घेणा …
शेती आणि शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा मानला जात असून भारत हा कृषीप्रधान देश आहे असे जगभर प्रसिद्ध आहे. मात्र शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक गरज देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रात्रीचा वीज पुरवठा हा धोकादायक असून रात्री सरपटणारे प्राणी तसेच रानडुक्कर शेतकऱ्यांच्या जीवावर बेततात त्यामुळे आम्हाला दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *