सोयाबीनचे आठवडाभर होता चढा दर, रात्रीतून बिघडले गणित भाव घसरले!

Shares

मागील ८ दिवसापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत होती मात्र आता एका रात्रीत सोयाबीनचे भाव कमी झाले आहे. सोयाबीनला ७ हजार ७७० दर मिळत होता तर आज हे दर ६ हजार ९०० वर आले आहे. त्यामुळे आता सोयाबीनची साठवणूक करावी की विक्री? असा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

सोयाबीनचे आजचे दर

soybean bhav

हे ही वाचा (Read This ) अबब! दिवसाला १२ लिटर दूध देणारी शेळी

शेतकऱ्यांना फायदा की चिंता ?

मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात वाढ होत होती तर हे दर अजून काही दिवस कायम राहतील तर दरात अजून वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती आणि जरी दर कमी झाले तर ५० ते १०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कमी होईल. मात्र एका रात्रीत ४०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जेव्हा सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती तेव्हा ज्यांनी सोयाबीनची विक्री केली त्यांचा फायदा झाला असून साठवणूक करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता चिंता होत आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

टप्याटप्याने विक्री करणे गरजेचे ?
सोयाबीनच्या दरात सुरुवातीपासूनच चढ उतार होत असतांना आपण पहिले आहे. मात्र इतक्या कमी वेळेत इतका मोठा दरात बदल हा पहिल्यांदाच झाला आहे. त्यामुळे शेतकरी थोडे गोंधळले असले तरी त्यांनी टप्याटप्याने विक्री करणे गरजेचे आहे. असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *