इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

शेतीमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मिळतोय आधार

Shares

कोरोना काळामध्ये शेतीमालाचे सर्व नियोजन, अर्थकारण विस्कटले होते. तेव्हा शेतकऱ्यांना पैशांची गरज आणि शेतमालाचे घसरलेले दर असे दोन्ही अडचणींचा सामना करावं लागत असतांना शेतकऱयांना पणन संघाच्या शेतीमाल तारण योजनेचा आधार मिळाला.

हे ही वाचा (Read This)  शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान

शेतकऱ्यांनी आपले तारण ठेवत बाजार समित्यांकडून कर्ज घेऊन आपली गरज भागवली. त्यानंतर दरामध्ये सुधारणा झाल्यानंतर तोच माल विकून उत्पादनात भर पाडली. मागील काही वर्षांपासून ही योजना राबवली जात असून याचे महत्व शेतकऱयांना आता समजले आहे. तर राज्यातील ७७ बाजार समित्यांच्या माध्यमातून तब्बल ५२ कोटींचे शेतमाल तारण कर्ज वितरित केले आहे, असे पणन संघाने सांगितले आहे.
तारण योजनेमध्ये शेतीमालाच्या ७५% रक्कम ही शेतकऱ्यांना ६ महिन्यापर्यंत ६% व्याजाने दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांची समस्या तर मिटतेच पण पुन्हा वाढीव दर मिळाल्यावर शेतीमालाची विक्रीही करता येते.

शेतमालाच्या प्रकारानुसार कर्जाचे स्वरूप

शेतमाल प्रकार १
सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडीद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता ६ टक्के व्याजदर आहे.

हे ही वाचा (Read This)  या पिकाची लागवड करून मिळवा १० वर्षापर्यंत भरघोस नफा

शेतमाल प्रकार २
मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या ५० टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता ६ टक्के व्याजदर आहे.

हे ही वाचा (Read This)  खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही, उन्हाळी सोयाबीन बहरले !

खरिपातील पिकांना आधार?

नैसर्गिक संकटांमुळे खरिपातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घेत झाली होती. खरिपातील मुख्य पीक असणाऱ्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. तर त्यास मुबलक असा दर देखील मिळत नव्हता. तेव्हा सर्व बाजूने अडकल्यानंतर शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घेतला होता. यामध्ये खरिपातील तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, हरभरा, करडई या शेतीमालाचा समावेश होतो.

हेही वाचा :- किरीट सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांवर मोठा आरोप, ‘तो’ हवालाकिंग कुठे आहे ? केला असा सवाल

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *