शेतकऱ्यांना १० लाख रुपये जिंकण्याची उत्तम संधी, ग्रँड चॅलेंज
शेतकरी शेती बरोबर पशुपालन करत असतो. यामध्ये दुग्ध म्हणजेच डेरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. शासनाने या व्यवसायाला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पशुपालन स्टार्टअप योजना सुरु केली आहे. या पशुपालन स्टार्टअप योजनेअंतर्गत एक ग्रँड चॅलेंज ही स्पर्धा घेण्यात येत आहे. शासनाकडून या स्पर्धेचे बक्षीस चक्क 10 लाख रुपये ठेवण्यात आले आहे.
ग्रँड चॅलेंज स्पर्धा
पशुसंवर्धन स्टार्टअप योजनेअंतर्गत १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून या स्पर्धेचे हे दुसऱ्या क्रमांकाचे पर्व आहे. यापूर्वी ही स्पर्धा १२ सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली होती. या स्पर्धेचे मुख्य उद्धीष्ट्य असे आहे की पशु संवर्धन तसेच दुग्ध व्यवसाय संबंधित अडचणींवर उपाययोजना तसेच नाविन्यपूर्ण व्यावहारिक दृष्ट्या साहाय्य करणे. या स्पर्धेअंतर्गत पशुसंवर्धन तसेच डेअरी व्यवसायाशी निगडित असणाऱ्या प्रमुख अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
हे ही वाचा (Read This ) तुमचे शिक्षण कमी आहे , रोजगाराच्या शोधात आहात तर या योजना खास तुमच्यासाठी आहे.
कोणत्या समस्या सोडवल्या जातील
१. दुग्धजन्य प्राण्यांसाठी गर्भधारणा निदान किट विकसित होणे.
२. उष्णता शोधक किटचा विकास करणे
३. प्राण्यांची ओळख असेच त्यांच्या शोधासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे
४. ग्राम संकलन केंद्रापासून ते डेरी प्लांट पर्यंत विद्यमान दूध पुरवठा साखळीमध्ये सुधारणा करणे.
५. कमी खर्चात शीतकरण तसेच दूध संरक्षण प्रणाली आणि डेटा लॉगर चा विकास करणे
६. वीर्य दोष साठवण्यासाठी तसेच त्याचा पुरवठा करण्यासाठी किफायतशीर तसेच दीर्घकालीन वापरा करतानुकूल पर्याय शोधणे.