इतर बातम्या

शेतकरी आंदोलनाचा भडका MSEB च्या सब स्टेशनमध्ये, अज्ञात शेतकऱ्याने लावली आग

Shares

शेतकऱ्यांना दिवस १० तास वीज मिळावी यासाठी महावितरण कार्यालयासमोर मागील ५ दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Swabhimani Shetkari Sanghatna) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करतांना दिसत आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कोल्हापूरमध्ये शेतकरी आंदोलनाची धग असतनाचा आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील दिवसा वीज द्यावी या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे

कोल्हापूरबरोबर आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील आक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या अज्ञात शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणचे (MSEB) सब स्टेशन पेटवल्याची घटना घडली असून मध्यरात्री शेतकऱ्यांनी हे सब स्टेशनला आग लावल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी अशी मागणी करत कोल्हापूर येथे माजी खासादर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून या आंदोलनाची दखल अद्यापही घेतली गेलेली नाही. त्यामुळे शेतकरी असंतोष व्यक्त करत असून त्यातूनच कसबेद डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटवण्यात आले.


हे ही वाचा (Read This )
 कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

काय आहे आंदोलनाचे कारण ?

रात्रीचा वीज पुरवठा हा धोकादायक असून रात्री सरपटणारे प्राणी तसेच रानडुक्कर शेतकऱ्यांच्या जीवावर बेततात त्यामुळे आम्हाला दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. परंतु शासन दरबारी या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. याच प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते बारा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा देखील देण्यात आला होता. तरीही कोणतीच कोणत्याही प्रकारची कारवाई घेतली नाही, त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये संताप झाला असून त्यांनी हे पाऊल उचलले असावेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १० तास वीज मिळावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *