खाद्यतेलाचे दर होणार कमी. नागरिकांना मिळणार थोडा दिलासा !
देशभरात वाढत्या महागाईने थैमान घातले आहे. आपल्या दररोजच्या वापरात आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यात खाद्यतेलाचे दर तर विचारूच नका. ते तर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने खाद्यतेलाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिफाईंड पाम तेलावर बेसिक कस्टम ड्युटी म्हणजेच BCD १७.५% होती आता ती १२.५% पर्यंत कमी करण्यात आली आहे. २१ डिसेंबर पासून हे नवीन दर लागू करण्याचा आदेश दिला असून मार्च २०२२ पर्यंत हे दर लागू होतील असे सांगितले जात आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने अधिसूचना जरी केली आहे.
खाद्यतेलाच्या आयातीत वाढ होईल का ?
खाद्यतेलाच्या दरात कपात केल्यानंतर कराचा १९.२५ टक्क्यावरून १३.७५ टक्क्यापर्यंत कपात होईल. या कपातीनंतर खाद्य तेलाच्या आयातीमध्ये वाढ होईल. कारण कच्च्या पामतेलावरील किमतीतील फरक केवळ ५.५ टक्के आला आहे. व्यापाऱ्यांना डिसेंबर २०२२ पर्यंत परवान्याशिवाय खाद्य तेल आयात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. वाढती महागाई पाहता सरकारने हा निर्णय घेतील आहे.
खाद्य तेल उत्पादकास याचा फटका बसेल का ?
खाद्यतेलाच्या दरात कपात केल्यानंतर पाम तेल उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे. भारत खाद्यतेलाच्या आयातीवर तब्बल २२ ते २२.५ दशलक्ष टन अवलंबित आहे जे की एकूण वापराच्या ६५% आहे. घेल्या २ वर्षात एकालागोपाठ आलेल्या संकटामुळे पाम तेलाची आयात ही १५ दशलक्ष टनवरून १३ दशलक्ष टन वर आली आहे.
सध्या काय आहेखाद्यतेलाची किंमत ?
खाद्यतेलाची सरासरी किंमत ही काय आहे हे आपण जाणून घेऊयात शँगदाना तेलाची किंमत ८१.४८ रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल १८७.४३ रुपये प्रति किलो, वनस्पति १३८.५ रुपये प्रति किलो, सोयाबीन तेल १५०.७८ रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेलाची किंमत १५०.७८ रुपये प्रति किलो आहे. पाम तेलाची किंमत १२९.९४ प्रति किलो अशी आहे.
सततच्या वाढत्या दरावर सरकार आता मात्र लक्ष ठेऊन आहे. एकंदरीत सर्वच खाद्यपदार्थाचे दर नियंत्रणात कसे आणता येईल यावर सरकार बारकाईने विचार करत आहे.