बाजार भाव

Valentine Day – गुलाब उत्पादक शेतकरी ‘लाल’, आले अच्छे दिन

Shares

कोरोनामुळे (Corona) मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून सर्वात जास्त अडचणीत फुल उत्पादक होते. आता मात्र चित्र बदलतांना दिसत असून प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या गुलाबाच्या (Roses) मागणी बरोबर त्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. मागील २ वर्षांपासून गुलाबाची निर्यात ही थांबली होती. शेतकरी (Farmer) नेहमी अगदी मोठ्या संख्येने गुलाबाची निर्यात (Export) करत असतो यंदा पहिल्यांदाच गुलाबास भारतीय बाजारपेठेत (Indian Market) सर्वोच्च दर मिळाला असल्यामुळे गुलाब (Rose) उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

भारतीय बाजारपेठेने केले मालामाल
पुण्यातील एका शेतकऱ्याने २५ वर्षांपूर्वी एका एकरात सुरु केलेली गुलाबाची शेती (Rose Farm) आता १० एकरमध्ये पसरलेली असून ते सलग गेल्या २५ वर्षांपासून भारताबरोबर परदेशात गुलाबाची निर्यात करत आहेत. व्हॅलेंटाईन डे साठी ते नेहमी ७० टक्के परदेशात तर ३० टक्के भारतात विक्री करतात. मात्र मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे निर्यातीवर बंधन असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता त्यांनी भारतीय बाजारपेठेत या गुलाबांची विक्री केली असता त्यांना भारतीय बाजारपेठेने आता मालामाल केले आहे. त्यांनी यंदा ७० टक्के गुलाबाची विक्री भारतीय बाजारपेठेत केली आहे.

हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय

इतिहासात प्रथमच मिळाला उच्चांकी दर
मागील २ वर्षांपासून ठप्प पडलेल्या गुलाब बाजारात आता गर्दी होतांना दिसत असून गुलाबाला प्रति गुलाब प्रमाणे १८ ते २१ रुपये असा दर सुरु आहे. तर फेब्रुवारी २०२० मध्ये गुलाबास १५० ते २०० रुपये प्रति किलो असा दर होता आणि आज गुलाबास ४०० ते ५०० रुपये प्रति किलोप्रमाणे दर सुरु आहे. इतक्या वर्षांपासून गुलाब उत्पादक शेतकरी हा परदेशात निर्यात करण्यावर जास्त भर देत होता. मात्र यंदा गुलाबास मिळालेला उच्च दर (Highest Rate) पाहून शेतकऱ्यांनी भारतीय बाजारपेठेतच गुलाबाची विक्री करण्याचे ठरवले आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो हा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखों रुपये

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *