दुधातील फॅट कसे वाढवावे
तुम्ही पशुपालक असून दूधाचा व्यवसाय करत असाल आणि काळजी घेऊन देखील दुधाची चव हवी तशी येत नाही आणि फॅटचे प्रमाण कमी आहे. तर तुम्हाला अजून थोडी काळजी घेण्याची गरज आहे. दुभत्या जनावरांच्या आहारात थोडा बदल करण्याची गरज आहे.
दुभत्या जनावरांचा आहार असा असावा आणि घ्यावयाची काळजी –
१. जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश अवश्य करावा.
२. उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा. उसाचे वाढे,भाताचा पेंढा,गव्हाचे काड असा निकृष्ट दर्जाचा चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश कमी होतात.
३. गाई-म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंड,मका भरडा, तुर,हरभरा,मुग,चुनी,गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे.
४. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
५. जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी खनिज मिश्रण व खनिज चाटण देणे गरजेचे आहे.
६. दूध काढताना पुरेशी स्वच्छता बाळगावी.
७. दुधाळ जनावरांना शक्य असल्यास मोकळे सोडावे.जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल.
८. व्यायाम झाल्यामुळे गाईच्या दूध उत्पादनात आणि फॅटच्याप्रमाणात वाढ होते.
९. दूध काढण्यातील अंतर समान असावे.
१०. जर सकाळी सहा वाजता दूध काढले सायंकाळीसहा वाजताच दूध काढावे.
११. अंतर वाढले तर दूध वाढते पण फॅट कमी होतात.
दुभत्या जनावरांची राहण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. त्यांना वेळोवेळी पौष्टिक आहार दिला तर फॅटचे प्रमाण वाढतेच त्या बरोबर दूध उत्पादनात वाढ देखील होते.