सीताफळ बागातील कीडीचे व्यवस्थापन

Shares

सीताफळ हे पीक डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोरडवाहू प्रदेशात सीताफळाचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रात पुणे , धुळे , बीड आणि जळगाव येथे सीताफळाची शेती प्रामुख्याने केली जाते.
अनेक डोंगराळ प्रदेशामध्ये सीताफळाचे झाड नैसर्गिकरीत्या वाढलेले दिसून येते.त्यामुळे यांवर कीड आणि रोग प्रादुर्भाव लवकर होतो. सीताफळ या पिकावर रोग व किडी कमी प्रमाणात लागतात. परंतु बदलत्या हवामानामुळे किडी लवकर लागत आहे. त्यावर वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या किडी व रोग आणि त्यावरील नियोजन –

पिठ्या ढेकूण (पांढरे ढेकूण , मेण कीड) –
१. या किडींचा प्रादुर्भाव पावसाळयात जास्त होते.
२. या किडी पाने , कोवळ्या फांद्या , कळ्या आणि कोवळी फळे यांचे शोषण करतात आणि त्यांच्यातील रस पिऊन घेतात.
३. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फळे आणि कळ्या गळ्याला लागतात.
४. झाडाची पाने काळी पडतात.
५. या किडी मधासारखा चिकट पदार्थ सोडतात.

नियंत्रण –
१. ही कीड लागल्यास लागलीच कीडग्रस्त फांद्या , पाने काढून टाकावेत.
२. त्यांवर १०% कार्बारील भुकटी टाकून गाडावीत.
३. व्हर्तीशिलीयम लिकॅनी (फुले बगीसाइड) हे जैविक बुरशीनाशक ४० ग्रॅम +५० ग्रॅम फिश आइल रोझीन सेप प्रती १० लिटर पाण्यात टाकून त्याची फवारणी करावी.
४. १५ दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा मिलीबगला खाणारे परभक्षी किटक क्रिटोलिमस मोन्टोझरी प्रती एकरी ६०० ग्रॅम बागेतील झाडावर सोडावेत.
५. क्लोरोपायरीफॉस २५ मिली. + २५ ग्रॅम ऑइलरोझीन सोप, बुप्रोफेझीन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पाण्यात मिसळून फवारणी केल्यास देखील या किडीवर नियंत्रण आणता येते.

फळ पोखरणारी पतंग कीड ( फूट बोरर) –
१. दक्षिण भारतात ही कीड आढळून येते.
२. ही कीड फळामध्ये घुसते.
३. फळामध्ये घुसतांना या वेडावाकडा मार्ग तयार करते.
४. फळामधील गर या किडी खाऊन टाकतात.
५. या किडीमुळे फळे गळून पडतात.
६. या किडींची विष्टा फळावरील जमा होते.

नियंत्रण –
१. किडकी फळे वेचून लागीच नष्ट करावीत.
२. झाडाजवळ खणून माती हलवून घ्यावी.
३. ४० ग्रॅम कार्बारील १० लिटर पाण्यात मिसळून ते फवारावे.
फळमाशी –
१. ही कीड वर्षभर आढळून येते.
२. ही कीड फळांच्या आतमध्ये अंडी घालते.
३. ही कीड फळाला बारीक छिद्र करते .
४. ही कीड लागली की फळे लगेच खराब होतात.
५. फळे मोठ्या प्रमाणात गळायला लागतात.

नियंत्रण –
१. किडलेली फळे वेचून घ्यावीत.
२. जमीन खोलवर खणून त्यात ही फळे टाकून त्यांचा नाश करावा.
३. पाण्यात विरघळणारे ४० ग्रॅम कार्बारील १० लिटर पाण्यात टाकून त्यांची फवारणी करावी .
४. १० मी. ली. मेटॉसीड + ७०० ग्रॅम गूळ + ३ थेंब सीट्रॉनील ऑईल एकत्रित करून घावेत.या मिश्रणाचे ४ थेंब टाकून ते प्लॉस्टिकच्या डब्यात टाकावे. या डब्याला २ मी.मी. छिद्र करावे. त्यामुळे या किडीचे नर आकर्षित होऊन मरून पडतील.

मऊ देवी कीड ( सॉफ्ट स्केल इन्सेक्ट) –
१. या किडीचे २ प्रकार पडतात. दोन्ही प्रकार सीताफळ पिकास हानिकारक असतात.
२. ही कीड मोठ्या प्रमाणावर पानांची नासाडी करतात.
३. ही कीड पानांच्या खालच्या बाजूस अंडी घालतात.
४. या किडी एका वर्षात ३ पिढ्या तयार करतात.

नियंत्रण –
१. या किडीच्या निवारणासाठी पिकांवर मेलॉथिऑन ची फवारणी करावी.
२. १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ५ वेळा ही फवारणी करावी.

फळकिडे –
१. सीताफळ बरोबरच द्राक्षे फळावर देखील फळ किडे आढळून येतात.
२. ही किडे आणि त्यांची पिल्ले पानातील संपूर्ण रस शोषून घेतात.
३. यांचा जीवनक्रम छोटा असतो.
४. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने गळून पडतात.

नियंत्रण –
१. फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी २ ग्रॅम, बुप्रोफेझीन २५ एससी २० मिली , डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२ ग्रॅम, फिप्रोनील ५ एससी ३० मिली किंवा अॅसिफेट ७५ एसपी ८ ग्रॅम हे द्रावण १० लिटर पाण्यात मिसळून त्यांची फवारणी करावी.
२. या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यासच या द्रवणाची फवारणी करावीत.

मुळांवर गाठी करणारी सूत्रकृमी –
१. सूत्रकृमीच्या ५० जाती आहेत.
२. मेलॉईडीगायणी इक्वागणीटा ही जात महाराष्ट्रात आणि उष्ण कटिबंधात आढळून येते.
३. ही मादी तोंडात असणाऱ्या सुई सारख्या सूक्ष्म अवयवाच्या साह्याने संपूर्ण रस शोषून घेते.
४. या आकाराने लांबट दोऱ्यासारख्या असतात.
५. या १.१० मी.मी. ते १.९५ मी. मी. पर्यंत लांब असतात.
६. या झाडातील अन्नरस शोषून घेतात.
७. यांच्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होतात आणि झाडाची वाढ खुंटते.
८. पाने पिवळी पडतात आणि कालांतराने गळून पडतात.
९. यांच्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

नियंत्रण –
१. सूत्रकृमी नशकानाचा वापर अत्यंत खर्चिक असतो. त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
२. फोरेट १० जी २०० ग्रॅम जमिनीत खोलपर्यंत मिसळावे.
३. झेंडूच्या मुळांमध्ये सूत्रकृमी नाशक गुणधर्म असतात.त्यामुळे बागेत झेंडूच्या फुलांची लागवड करावी.
४. प्रत्येक झाडाला २ ते ३ किलो निंबोळी द्यावे.

सीताफळ बागेतील प्रमुख किडींचे नियंत्रण वेळीच केले पाहिजे जेणेकरून ते पसरणार नाहीत. आणि उत्पादन चांगले येईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *