दुधाच्या चारपट जास्त कॅल्शिअम असलेले शेवगाच्या शेंगा !
आपण शेवग्याच्या शेंगाचे वरण , मसाल्यात शेंगा टाकून भाजी बनवत असतो. ह्या शेंगांमध्ये अनेक औषधी गुण दडलेले आहेत. उष्ण ते समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात शेवगाच्या शेंगाचे वृक्ष १० मी पर्यंत उंच वाढते. शेवगाच्या शेंगा बरोबरच त्याच्या पानांचा , फुलाचा देखील औषधी म्हणून वापर केला जातो. ह्या शेंगांमध्ये दुधाच्या चार पट तर मटणाच्या ८०० पट जास्त कॅल्शिअम असते. कुपोषण थांबविणारी शेंग म्हणून देखील यास ओळखले जाते. आयुर्वेद मध्ये शेवगाच्या शेंगाचे चांगले महत्व आहे. शेवगाच्या शेंगांमध्ये पोषक घटकांची मात्रा बऱ्याच प्रमाणात आहे. यांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी , बी , ए उपलब्ध आहे. शेवगाच्या शेंगा ३०० विकारांवर उपयोगी ठरते. जाणून घेऊयात शेवगाच्या शेंगाचे अजून किती फायदे आहे.
शेवगाच्या शेंग्याचे फायदे –
१. संसर्ग , दुखापत झाल्यास शरीरास सूज येते अश्या वेळेस शेवग्याच्या शेंग्यांचे सेवन केल्यास सूज उतरण्यास मदत होते.
२. रक्तातील साखरेची पातळी वाढली असेल तर त्यावर नियंत्रण करण्यास शेवग्याच्या शेंगा मदत करतात.
३. गॅस, अपचन यांसारखे पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते.
४. डोळ्यांची दृष्टी कमी होत असेल तर या शेंगाचे सेवन करावेत.
५. याचे सेवन केल्यास केस चमकदार होतात.
६. डोकं दुखत असेल तर शेवगाच्या पानांचा आहारात समावेश करावा.
अश्या अनेक विकारांवर शेवगाच्या शेंगा उपयुक्त ठरतात. शेवगाच्या शेंग्यांचे सेवन नियमित केल्यास त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.