ड्रोनने शेत फवारणीसाठी मिळणार १० लाखापर्यंत अनुदान
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून आधुनिक शेती संबंधित अनेक घोषणा करण्यात आल्या.केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून कृषी पदवीधारकांना ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली असून अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या वेळेची तसेच पैशांची चांगली बचत होणार आहे. अनेक पिकांसाठी ड्रोनद्वारे फवारणी करणे उपयुक्त ठरू शकत असल्यामुळे काही संशोधन संस्थांमधून केंद्राकडे शिफारस करण्यात आली होती.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठीच्या १४ अंकाचा युनिक लँड आयडीची चाकण पासून सुरुवात
कृषी यांत्रिकीकरण अभियानातील निधीचा वापर करण्यास मिळाली मान्यता
शेतकरी पीक संरक्षणासाठी सध्या कीडनाशकांच्या फवारणी करण्यासाठी पाठीवरचे पंप, एसटीपी पंप, ट्रॅक्टरचलित पंप तसेच अतिउच्च क्षमतेचे विदेशी पंप वापरतात. मात्र सध्याच्या तंत्रज्ञानाला काही मर्यादा आहेत. फवारणीसाठी मजुरांचा वापर करताना विषबाधेचे प्रकारही होतात. यामुळे ही शिफारक करण्यात आली होती. राज्यातील अनेक ठिकाणी ड्रोनच्या चाचण्यांचे निष्कर्ष पाहून ड्रोनसाठी थेट अनुदान देण्याचा केंद्राने निर्णय घेतला व त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियानातील निधी वापरास मान्यता देण्यात आली आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो हा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखों रुपये
रोजगाराबरोबर अनुदानही मिळणार
केंद्राने घेतलेल्या या निर्णयानंतर सुशिक्षित बेरोजगार तसेच कृषी पदवीदारांना रोजगार उपल्बध होईल. कृषी पदवीधारकांना ५ लाखांपर्यंत तर १०वी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असणाऱ्याला ४ लाख पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
हे ही वाचा (Read This ) विदर्भासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले, जबाबदार कोण ?
अर्ज आणि संपर्क कुठे करावा ?
कृषी आयुक्तालयातील अवजारे विभागाचे उपसंचालक विष्णू साळवे तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तुम्हाला संपर्क करता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ३१ मार्चपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.