आरोग्य

डार्क सर्कल्स पासून त्रस्त आहात ? मग असा करा टोमॅटोचा वापर

Shares

टोमॅटोचे सेवन आपण रोजच्या जेवणात करतो. शरीरासाठी अनेक फायदे असणाऱ्या टोमॅटोमध्ये विटामिन ‘ए’ हे जीवनसत्त्व असल्यामुळे डोळ्यांची चमक आणि सौंदर्यात वाढ होते. टोमॅटोचा वापर करून आपण डोळ्याखालील डार्क सर्कल्स दूर करू शकतो. डार्क सर्कल्सची समस्या सामान्य आहे. बदलती जीवन शैली, वाढता तणाव आणि मोबाईल कम्प्युटर स्क्रीन समोर जास्त वेळ बसून राहिल्याने ही समस्या आणखी वाढते. जर आपणही डार्क सर्कल्स मुळे त्रस्त असाल तर खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने डार्क सर्कल मिटवू शकता.

जाणून घेऊ नक्की कसे :

१) टोमॅटो आणि एलोवेरा :- टोमॅटोचा रस अतिशय गुणकारी ठरतो. एक चमचा टोमॅटोच्या रसामध्ये दोन एलोवेरा मिक्स करून डोळ्याच्या खाली मसाज करावी. नंतर ते मिश्रण पंधरा मिनिट डोळ्याखाली लावून ठेवावे. हा प्रयोग आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. काही दिवसातच ही समस्या दूर होईल.

२) टोमॅटो आणि लिंबू :- लिंबू हा केस गळतीसाठी जसा उपयुक्त ठरतो. तसाच तो डार्क सर्कल घालवण्यात सुद्धा मदत करतो. त्यासाठी टोमॅटो आणि लिंबूचा एक-एक चमचा रस घ्यावा आणि मिक्स करून डोळ्याखाली लावावा, दोन्ही पदार्थांमध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्याखालील काळे सर्कल दूर होण्यास मदत होते.

३) टोमॅटो आणि बटाटे :- बटाट्याचा रस सुद्धा उत्तम ठरतो कारण तो अँटीएजिंगचे काम करतो. हे मिश्रण करण्यासाठी सर्वात आधी बटाट्याचा रस काढून त्यात टोमॅटोचा रस टाकावा आणि रस १५ ते २० मिनिटे लावून ठेवावा. एक दिवसआड आपण रस डोळ्याखाली लावला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *