डाळिंबात आहे अनेक आजार बरे करण्याची क्षमता
भारतात गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश राज्यात डाळिंब लागवड वाढत आहे. भारतात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. डाळिंब हे फळ अतिशय पौष्टिक मानले जाते. डाळिंब फळात लोह, प्रथिने. कर्बोदके, तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. डाळिंबाचा उपयोग औषधी म्हणून देखील होतो. डाळिंब फळाची साल औषधी म्हणून वापरली जाते. अनेक आजारांवर डाळिंब अत्यंत उपयोगी ठरते. जाणून घेऊयात डाळिंबाचे फायदे कोणते आहेत.
डाळिंबाचे फायदे –
१. डाळिंब हे पित्तनाशक म्हणून ओळखले जाते.
२. डाळिंब रसाचे सेवन केल्यास भूक वाढते व पचन क्रिया सुधारते.
३. डाळिंब हृदयास अत्यंत फायद्याचे ठरते.
४. खडीसाखरेबरोबर डाळिंबाचे सेवन केल्यास पोटातील जळजळ , आंबट ढेकर कमी होते.
५. दीर्घ उपवासात हे फळ अत्यंत उपयुक्त ठरते.
६. उच्च रक्त दाबाचा त्रास होत असले तर डाळिंब त्यावर फायदेशीर ठरते.
७. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी डाळिंब मदत करते.
८. पोटात गॅस होत असेल तर त्यावर डाळिंब उपयुक्त ठरते.
९. डाळिंबामुळे रक्तभिसरण क्रिया सुधारते.
१०. खूप दिवसापासून खोकला असल्यास डाळिंबामुळे तो बरा होण्यास मदत होते.
डाळिंबाचे असे अनेक फायदे आहेत. परंतु डाळिंबाचे दाणे काढल्यानंतर लगेच खावेत. जास्त काळ काढून ठेवल्यास त्यातील पोषक द्रव्ये कमी होतात.