फलोत्पादनरोग आणि नियोजन

डाळिंब तडकण्याचे कारणे आणि उपाय

Shares

डाळिंब हे पीक महाराष्ट्रातील कोरडवाहू परिसरासाठी जणू एक वरदान ठरले आहे. अहमदनगर, सांगली, सोलापूर, आणि नाशिक भागातल्या डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात घेतली जाते.डाळिंब फळाचा टिकावूपणा व फळात मोठ्या प्रमाणात असलेले प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स व इतर औषधी गुणधर्मामुळे त्याला जगभरातून मागणी वाढत चालली आहे. तुम्ही बऱ्याचदा डाळिंब वर पडलेली रेघ पहिली असाल त्याला तडे गेलेले देखील पाहिले असाल. तर हे तडे का जातात आणि यावरील उपाय आपण जाणून घेऊयात.


कोणत्या कारणांमुळे फळे तडकतात – 

१. जमिनीत नांगरटीच्या तासात रोपांची लागवड.

२. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असणे. 

३. हवेतील तापमान व आर्द्रतेत रात्री व दिवसातील तापमानात तफावत.

४. फळे तडकू नयेत किंवा डाळिंबला भेगा पडू नयेत यासाठी काय आहेत उपाय योजना.

५. फळ तडकणे हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्या अनेक कारणे कारणीभूत आहेत. 

६. चुकीचे पाणी व्यवस्थापन

७. चुकीची जमिनीची निवड 

 ८. हवामानातील बदल 

९. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी.

डाळिंब तडकू नयेत यासाठी उपाय –

१. जमिनीच्या पोतानुसार पाण्याचे नियोजने करावे.

२. ठिंबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा. 

३. पाण्याचा नियंत्रित वापर करावा, डाळिंबास जास्त  पाण्याचा वापर करुन नये.

४. तांबड्या, हलक्या जमिनीत कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यास बोरॉनची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची असताना करावी.

५. फळांची फुगवण तसेच रंग चव चांगली  येण्यासाठी  फळ पक्कतेच्या  काळात पोटॅशिअम शोनाईट २ किलो २०० लिटर पाण्यातून ठिबक द्वारे किंवा फवारणीद्वारे १५ दिवसाच्या  अंतराने २ ते ३ वेळा द्यावे.

६. डाळिंबासाठी मध्यम, निचऱ्याची जमीन निवडावी.

७. रोपांची लागवड ही  २ बाय २ बाय २ फुट लांबी रुंदी खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये  माती  २ घमेले कुडलेले शेणखत  दीड  किलो सुपर फॉस्फेट ५० ग्रॅम फोरे यांचे मिश्रण करुन खड्डे भरुन रोपांची लागवड करावी.

८. माती परीक्षणसाठी  प्रतिनिधिक स्वरुपाचा खड्डा घेऊन प्रत्येक एक फुटातील मातीचा पहिला थर, दुसरा  थर आणि तिसऱ्या फुटात माती असल्यास तिसरा थर अशा थराप्रमाणे माती घेऊन त्याचे प्रयोगशाळेत तपासणी करुन घ्यावी.  

९. माती परीक्षण अहवालाप्रमाणे  सामू हा ६.५ ते ८.० पर्यंत असावा.  विद्युत वाहकता ही ०.५० डेसीसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असावी तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण सर्व थरात १२ टक्क्यापेक्षा कमी असावे.

१०.  परीक्षणावरुन डाळिंबास शिफारस केल्याप्रमाणे  पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ४ ते ५ घमेले तसेच ६२५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद आणि २५० ग्रॅम पालाश प्रति वर्ष प्रति झाडास ताण संपल्यानंतर पहिले पाणी देण्यापुर्वी द्यावे  व उर्वरितत नत्राची मात्रा दोन समान हप्त्यात विभागून द्यावी.

११. पहिली मात्रा ताण संपल्यानंतर बेसल डोसच्या वेळी  व उर्वरित मात्रा बहारानंतर ४५  दिवसांननी आळे पद्धतीने  द्यावी.

१२.  मुक्त चुनखडीचे  प्रमाण ५ टक्के पेक्षा  कमी असल्यास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे द्यावे, म्हणजे या खताद्वारे स्फुरदाव्यतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा झाडांना होतो तसेच मॅग्नेशिअम  सल्फेटचा वापर प्रति झाड २५ ग्रॅम प्रमाणे करावा. 

१३. ५० टक्के फुले असताना झाडावर फुले मायक्रो ग्रेड -खख द्रवरुप सुक्ष्म अन्न द्रव्ये ग्रेडची  फरवाणी करावी. 

१४.  आच्छादनाचा वापर केल्यास तापमान व आद्रेतेवर नियंत्रण राहील.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *