इतर बातम्याबाजार भाव

कापसाच्या दराला रशिया-युक्रेन युद्धामुळे उतरती कळा, व्यापारी मात्र जोमात!

Shares

यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे त्यास चांगला भाव मिळत होता. त्यामुळे कापसाची बाजारपेठ चांगली खुलतांना दिसत होती. कापसाच्या दरात सुरूवातीच्या तुलनेत अधिक वाढ झाली आहे. तर कापसाने १० हजारांचाच पल्ला गाठला होता.
कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त झाला आहे.

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम कापूस बाजार समितीमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. कापूस बाजारामध्ये मंदीचे सावट पसरले असून चांगल्या प्रतीच्या कापसास १० हजार रुपये प्रति क्विंटल तर दुसऱ्या , तिसऱ्या वेच्यातील कापसास ६ हजार ५०० असा दर मिळत आहे.

कापसाला ५ महिन्यांपूर्वी ६ हजार रुपये पर्यंत दर मिळत होता. त्यानंतर या दरामध्ये वाढ होत होत कापसाला १० हजारांचा उच्चांकी दर मिळाला त्यामुळे शेतकरी उत्पादकांबरोबर व्यापाऱ्यांना देखील दिलासा मिळाला.

कापूस दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना झाला ?

हंगामाच्या सुरुवातीलाच अनेक शेतकऱ्यांना पैश्यांची गरज असल्यामुळे त्यांनी कापसाची विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी जास्त उत्पन्न पडले नाही. मात्र व्यापाऱ्यांचा चांगलाच फायदा झाला.

सध्या खुल्या बाजारपेठेत कापसाला ७८ हजार रुपये ते ६७ हजार रुपये प्रति खंडी म्हणजेच ३.५६ क्विंटल दर मिळत असून सरकी ला साडेतीन हजार ते चार हजार रुपये दर मिळत आहे.

व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीला लावला ब्रेक

युक्रेन आणि रशिया मध्ये होत असलेल्या युद्धामुळे बाजारात मंदीचे सावट पसरले असून व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करण्यास ब्रेक लावला आहे.
देवळी बाजारपेठेमध्ये आतापर्यंत साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून एप्रिल महिन्यापर्यंत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी होण्याची शक्यता दर्शवली आहे.

या बाजारपेठेमध्ये वर्धा जिल्ह्यातील काही गावांबरोबर यवतमाळ, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यातील शेतकरी येत असून दररोज ३ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे.

युद्धाचा परिणाम सोयाबीनच्या दरावर

तर दुसरीकडे सोयाबीनच्या दरात चांगली वाढ होऊन आता दरात स्थिरता आहे. सुरवातीला सोयाबीनला अगदी कवडीमोल भाव होता त्यानंतर आता सोयाबीनला ८ हजार रुपये भाव मिळाला होता मात्र आता युद्धाचा परिणाम आता सोयाबीनच्या दरावर झाला असून हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *