कापसाला १० हजारावर दर, शेतकरी अजूनही संभ्रमात साठवणुकीवर भर !
कापसाला ( Cotton) सुरुवातीला चांगला दर मिळाला होता मात्र मध्ये दरात चढ उतार होत असून नंतर पुन्हा दरात तेजी दिसून आली होती. त्यामुळे शेतकरी ( Farmer) आनंदांत असून त्याला खूप मोठा आधार मिळाला असून कापसाने १० हजाराचा दर पार केला होता. आता कापूस शेवटच्या टप्प्यात असून देखील शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची ( Cotton Rate Incresed) अपेक्षा आहे. सध्यातरी कापसास हमीभावापेक्षा दीड पटीने जास्त दर मिळत असला तरी यापेक्षा अधिक दर मिळेल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. कापसाच्या दरात वाढ झाली आहे मात्र त्याच्या उत्पादनात घट होतांना दिसून येत आहे. मागील १५ दिवसापासून कापसाचे दर हे स्थिर आहेत. बाजारपेठेत कमी प्रमाणात आवक होत आहे असे अनेक व्यापाऱ्यांचाही म्हणणे असून वाढीव दराच्या अपेक्षेत शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापूस साठवून ठेवला आहे.
हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून बाराही महिने कमवा लाखों रुपये
कापूस साठवणुकीचा शेतकऱ्यांना फायदा होईल का ?
कापूस उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे कापसाच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. कापसाचे दर वाढल्यानंतर वस्त्र उद्योजकांनी कापसाच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र त्याचा काहीही परिणाम कापूस दरावर झाला नसल्यामुळे कापसाच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सहेतकर्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली असून या साठवणुकीचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांची भूमिका ठरली फायदेशीर
शेत मालास योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यापासून महत्वाची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सोयाबीन तसेच कापसाच्या दरात वाढ झाली होती. शेतकऱ्यांनी शेतमालाची साठवणूक करून ठेवली होती त्यांनतर त्यांनी टप्याटप्याने शेतमाल विक्रीस काढला होता. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे यावेळेस कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. कापसाला तर पांढरे सोने म्हणून सगळीकडे संबोधिले जात आहे. कापूस आता अंतिम टप्यात आहे तरीही शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे.