कापसाच्या भावात तेजी !
सोयाबीन पिकास अपेक्षेप्रमाणे दर मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. या साठवणुकीचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना झाला होता. असेच काही कापसाबाबत झाले आहे. शेतमालाच्या उत्पादनापेक्षा शेतमालाच्या किमतीवर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. कापसाला सुरवातीला दर थोडा चांगला होता. मात्र दिवसेंदिवस कापूस दरात घट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.दरवर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड या वर्षी कमी प्रमाणात झाली आहे. खांदेशात देखील कमी प्रमाणात उत्पादन मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाला मागणी जास्त तर पुरवठा कमी असे चित्र दिसून येत होते. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. कापसाचे दर थेट ९ हजार रुपये प्रति क्विंटल वर जाऊन पोचले आहे.यंदा दरवर्षी पेक्षा कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातही अवकाळी पाऊस पडल्यामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस उत्पादन जरी कमी झाले असले तरी कापसाच्या मागणीत आता वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ झाल्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय फायदेशीर ठरला का ?
हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन प्रमाणे कापसाच्या दरात देखील जास्त संख्येने घसरण होतांना दिसून येत होते. त्यामुळे कापूस उत्पादकांनी कापसाची साठवणूक करण्यावर जास्त जोर दिला होता. शेतकऱ्यांच्या या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसून येत आहे. सुरवातीला कापसाचे दर १० हजार रुपये प्रति क्विंटल होते. नंतर या दरात घसरण होऊन हे दर थेट ७ हजारावर येऊन थांबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर भर दिला होता. आता मात्र नंदुरबारबाजार समितीमध्ये कापसाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
कापूस उत्पादक शेतकरी सुखावला
सतत कापसाच्या दरात घसरण होत होती त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. मात्र आता कापसाला सध्या मिळलेल्या दरामुळे शेतकरी सुखावला आहे. बाजार समितीमध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे. तसेच कापूस खरेदी केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे. कापसाच्या दरात आता अजून वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.
हे ही वाचा.