कापूस दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?
सुरवातीला कापसाला चांगला दर मिळत होता त्यानंतर त्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र शेतकऱ्यांनी वेळोवेळी सावधपणे घेतलेल्या निर्णयांमुळे कापसाच्या दरात वाढ होत गेली. आता या दराने तर आकाशच गाठले आहे. कापसाचे दर कमी होताच शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली असून त्यांनी टप्याटप्याने त्याची आवक सुरु केली होती. शेतकऱ्यांनी या घेतलेल्या निर्णयाचा चांगला परिणाम कापूस दरावर झाला आहे. दरातील तेजीचा फायदा काही मोजक्याच शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र परभणी जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील दर पाहूनच खेरेदी करण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले असून आता शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही विचारपूर्वक करावी.
हे ही वाचा (Read This) तुरीच्या बाजारभावात बदल तर सोयाबीनचे दर स्थिर.
कापसाची खरेदी वाढली ?
कापूस खेरदी करण्यासाठी बाजार समितीची परवानगी आवश्यक असते. परंतु आता वाढत्या दरात संधी साधण्यासाठी एक वाहन घेऊनही व्यापारी गावोगावी जाऊन कापसाची खरेदी करतांना दिसत आहे. शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करुन त्याची साठणूक करायची आणि दरात वाढ झाली की विक्री करायची. यामुळे शेतकरी हा मूळ किंमतीपर्यंत पोहचलेलाच नाही असेच चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी किमतीची चौकशी केल्याशिवाय खरेदी करू नये असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
फायदा नेमका कोणाचा ?
शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कापूस खरेदी करण्यासाठी व्यापारी आता शेतकऱ्यांच्या दारात जात आहेत. कापसाची विक्री न करता साठवणूक करुन आता दहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री केली जात आहे. त्यामुळे प्रति क्विंटलमागे व्यापाऱ्यांना दीड ते दोन हजारांचा फायदा होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधपणे पावले उचलली पाहिजे.