कापसाने केला १३ हजार ५०० चा टप्पा पार, ५० वर्षातील विक्रमी दर
शेतकऱ्यांकडे साठवणूकीतला कापूस आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तर कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. शिवाय दिवसाकाठी दरात वाढ ही सुरु आहे. दरात वाढ झाल्यामुळे आवक देखील वाढली आहे.
मुख्य बाजारपेठ असलेल्या अकोट बाजार समितीमध्ये आठवड्याभरापासून १२ हजारापर्यंतचा दर मिळत आहे. पण वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीने सर्व विक्रम मोडीत काढले आहे. कारण सोमवारी येथील बाजार समितीमध्ये कापसाला सोन्याप्रमाणे दर मिळाला आहे.
तब्बल १ हजार क्विंटल कापसाला १३ हजार ४५० असा विक्रमी दर मिळाला आहे. जे गेल्या ५० वर्षात झाले नाही ते यंदा बघण्यास मिळत आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो त्वरित करा अर्ज – ३१ मार्च शेवटची तारीख, शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान अर्ज
कापसाला मिळतोय विक्रमी दर
यंदा कापासाच्या दरात वाढ होऊन दर स्थिरावले होते. गेल्या अनेक दिवसांपासून १० ते ११ हजारावर दर होते. पण आवक कमी होताच पुन्हा दरात वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू या उपबाजारात गेल्या ४ दिवसांपासून दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची वाढ होत आहे.
तब्बल १ हजार क्विंटल कापसाला १३ हजार ४५० असा विक्रमी दर मिळाला आहे. जे गेल्या ५० वर्षात झाले नाही ते यंदा बघण्यास मिळत आहे.
हे ही वाचा (Read This ) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख
दरवाढीमुळे आवक वाढली
सध्या शेतशिवारामध्ये कापूस उभा नसला तरी अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी याची साठवणूक करुन ठेवली आहे. याचा फायदा आता विक्रमी दर मिळाल्याने होत आहे. गतआठवड्यातील गुरुवारी ११ हजार ७००, शुक्रवारी १२ हजार ४००, शनिवारी १२ हजार ७७० तर सोमवारी थेट १३ हजार ४४० रुपये दर मिळाला आहे.
सेलू सारख्या उपबाजार पेठेमध्ये तब्बल १८७ वाहनांमधून कापसाची आवक झाली होती. वर्धा जिल्हासह लगतच्या भागातून ही आवक कायम आहे. कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी आता वाढीव दरामुळे साठवणूकीतला कापूस बाजारपेठेत दाखल होताना पाहवयास मिळत आहे.
हे ही वाचा (Read This) कोरडवाहू शेती आणि नियोजन