कापसाने केला १२ हजारांचा टप्पा पार ? आवक घटली
इतर शेतीमालाच्या तुलनेत कापसाला सुरुवातीपासूनच चांगला भाव होता. मात्र मध्यंतरी दरामध्ये मोठी तफावत झाली होती. त्यांनतर पुन्हा दरामध्ये सातत्याने चढ उतार पाहण्यास मिळाली असली तरी मागील ५० वर्षातील विक्रमी दर कापसाला यंदा मिळाला आहे.
खरिपातील कापूस आता अंतिम टप्यात असला तरी काही प्रमाणात कापूस अजूनही साठवणूक करून ठेवला आहे. तर आता कापसाला १२ हजार रुपयांचा दर मिळत असून ज्या शेतकऱ्यांनी अजूनही कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. त्यांनाच याचा फायदा होणार आहे.
हे ही वाचा (Read This) आगळ्यावेगळ्या निळ्या रंगाच्या बटाट्याची लागवड करून मिळवा अधिक नफा
कापसाचे आजचे दर
मागील काही दिवसांपासून युक्रेन रशिया यांच्यातील युद्धाचा जागतिकस्तरावर परिणाम झाला आहे. अनेक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यात सोयाबीन, खाद्यतेल आणि सोने, चांदी व इतर घरबांधणीच्या साहित्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीयस्तरावर भाव वाढण्याच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कापूस घरीच ठेवला होता.
७०० रुपयांची वाढ
मागील चार दिवसांपासून कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १९ मार्च रोजी कापसाला सरासरी नऊ हजार २०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. त्यानंतर २२ मार्चला १० हजार ९०० रुपये भाव मिळाल्याने या चार दिवसांत तब्बल ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.
मोजक्याच शेतकऱ्यांना दरवाढीचा लाभ ?
कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी या भाववाढीचा फारसा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना प्रथम श्रेणी आहे त्या शेतकऱ्यांना या भाववाढीचा लाभ घेता येणार आहे.