कापसाला विक्रमी दर मिळणार? व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा,शेतकऱ्यांचा फायदा !
शेतकऱ्यांना यंदा नैसर्गिक तसेच आर्थिक अश्या दोन्ही संकटांचा सामना करावा लागला असून खरीप हंगामातील सर्व पिकांचे अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापसाचे देखील अवकाळी मुळे नुकसान झाले अवकाळी मुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. मात्र कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळत असल्याने उत्पादनातील घट बाजार भाव भरून काढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी चढ्या दराने कापूस विक्री करण्यासाठी कापसाची साठवणूक केली होती. शेतकऱ्यांच्या याच निर्णयाचा फायदा झाला असून कापसाला यंदा मागील ५० वर्षातील सर्वात विक्रमी भाव मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर १० हजार ५०० वर स्थिरावले आहे. त्यामुळे उत्पादन घट झाली असली तरी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा (Read This) औषध एक उपाय अनेक !
कापसाचे दर वाढण्याचे कारण ?
कापसाचे दर वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे उत्पादनात झालेली घट. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर होता. तर सरकीच्या दरात वाढ झाली की कापसाच्या मागणीत देखील वाढ होत आहे. घटलेले उत्पादन, प्रक्रिया उद्योगासाठी वाढत असलेली मागणी यामुळे स्थानिक पातळीवर व्यापाऱ्यांमध्ये कापसू खरेदीसाठी स्पर्धा होत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसून येत आहे.
कापसाने १० हजार चा टप्पा पार केला तरीही…
कापूस गाठींचा तुटवडा भासत असतानाही यंदा कापूस महामंडळाने दराबाबत कोणत्याही प्रकारचा हस्कक्षेप केलेला दिसून येत नाही. कापसाच्या वाढत्या दराला सरकारचा पाठिंबा असल्यामुळे कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. कापूस उत्पादनात झालेली घट आणि त्याची वाढती मागणी यामुळे कापसाच्या दराने १० हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.