कांदा पिकाचे लाखोंचे नुकसान, शेतकरी सापडला आर्थिक संकटात !

Shares

अतिवृष्टी अवकाळी नंतर पिकास अनुकूल असे वातावरण (Weather) निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून खूप अपेक्षा होत्या मात्र नियतीने असा काही खेळ खेळाला की आता पुन्हा शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या काही वेळासाठी अवकाळी पाऊस ( Untimely Rain ) पडला होता तर वातावरण हे ढगाळ. धुके असे काहीसे आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतांनाचे चित्र दिसून येत आहे. कोरोना (Corona) संकटामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडलेले होते त्यात एकलागोपाठ नैसर्गिक संकटे येत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र पूर्णपणे फिरतांना दिसत आहे. भारतामध्ये नोव्हेंबर डिसेंबर हा महिना थंडीचा महिना असतो. मात्र या महिन्यात पाऊस , गारपीट झाल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिकांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे.

वातावरणाचा पिकांवर झाला परिणाम
थंडीच्या दिवसात ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही वेळासाठी गारपीट ,पाऊस पडला होता. त्यामुळे ज्वारी पिकांवर मावा, चिकटा यांनी अतिक्रमण केले. त्याचबरोबर हरभरा पिकांचे किडे , तुडतुडे, घाटेअळी यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा काढणीला असतांना पावसामुळे पूर्ण भिजला असून कांद्याचे अधिक नुकसान झाले आहे. याचबरोबर भाजीपाला फळपिके यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.

हे ही वाचा (Read This ) पेस्टीसाईडचा सुरक्षित वापर करणे आहे अत्यंत गरजेचे.

शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले ..
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून याच परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर सर्वाधिक झाला आहे. सतत उध्दभवणाऱ्या संकटांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट झाली असल्यामुळे याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी अधिक महागड्या औषधे, फवारण्यांचा वापर करत आहे. शेतकरी (Farmers) पिकांची लागवड करतांनाच बियाणे, औषधे, खते यांचा अवलंब करत असतात. तर शेतकऱ्यांना आता पुन्हा खतांचा , फवारण्यांचा अवलंब करावा लागत आहे. शेकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे त्यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी होत आहे.

कांदा पिकावर बदलत्या वातावरणाचा जास्त परिणाम
महाराष्ट्रात कांदा पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. कांदा (Onion) हा काढणीला असतांना ढगाळ वातावरणामुळे तसेच अवकाळी गारपिटीमुळे कांदा शेतातच भिजला. त्यामुळे आता कांदा सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा अडचणीत सापडला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *