कांदा न विकल्या गेल्याने शेतकऱ्याने बाजार समितीच्या आवारातच घेतले विष

Shares

श्रीरामपुर: विक्रीसाठी आणलेल्या कांदा विकला न गेल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील टाकळीभान येथील उपबाजाराच्या आवारात काल रविवार (दि. १५) हा प्रकार घडला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या शेतकऱ्याला उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र जगधने यांनी दिली.

ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान येथील उपबाजारात कांदा बाजार सुरु आहे. काल रविवारी तालुक्यातील गुजरवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी भरत जाधव (वय ४०) यांनी आपला कांदा विक्रीसाठी उपबाजारात आणला होता. तीन आडत्यांकडे कांदा विक्रीसाठी लावला. मात्र काल लिलावाचा अधिकृत दिवस नसल्याने त्यांच्या नेहमीच्या आडतीवर कांदा गोणी फोडली असता तो माल विकला गेला नाही (नो बीट) झाला.

onion market rate

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: ऑनलाइन नवीन अर्ज असा करा

इतर आडतीवरील लिलाव मंगळवारी होणार होते. मात्र एका आडतीवरील कांदा नो बीट झाल्याने निराश होवुन जाधव यांनी काही वेळाने विषारी औषधाची बाटली घेऊन उपबाजार विषारी औषध प्राशन केले. त्यावेळी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जाधव यांना उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कांद्याचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. आता या नगदी पीकाबाबत शेतकऱ्यांची भूमिका बदलत आहे, कारण उत्पादन खर्च आणि वास्तविक उत्पन्न यात समतोल नाही. 2019 च्या तुलनेत कापणीचा खर्च दुप्पट झाला आहे. दुसरीकडे कांद्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. जानेवारीमध्ये कांद्याचा भाव 35 रुपये किलो होता, तो आता अनेक मंडईंमध्ये 1 रुपये किलोने विकला जात आहे. अशा परिस्थितीत कापणी आणि मालवाहतुकीचा खर्च जास्त होतो. मात्र यावेळी शेतकर्‍यांना कांदा काढण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे जास्त मजुरी देऊन कांद्याची काढणी सुरू आहे.

कांद्याचे दरात घसरण सुरूच, प्रश्न एकच शेतकरी जगणार कसा?

ही शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे

कांद्याच्या दरात दरवर्षी चढ-उतार होत असतात. असे असतानाही कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. येत्या वर्षभरात चांगला दर मिळण्याच्या आशेने राज्यात कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. नाशिक, सोलापूर, मालेगाव आणि इतर बाजारपेठेत कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. देशातील सर्वाधिक कांद्याचे पीक नाशिक जिल्ह्यात होते, मात्र येथील शेतकऱ्यांनाच अत्यल्प भाव मिळतो. लागवडीदरम्यान भावात होणारी चढ-उतार अप्रत्याशित आहे.त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटना प्रशासनाकडे कांद्याला किमान 30 रुपये किलो दर देण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा :- हनुमान चालिसाबाबत ठाकरे सरकारला टोला लगावला, तर ओवेसींबद्दल हे बोलले देवेंद्र फडणवीस

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *