विदर्भासह मराठवाड्यात पुढील ४ दिवस पुन्हा पाऊस ?
हवामान (Weather ) खात्याने पुन्हा पुढील ४ दिवस पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम आता राज्यातील अनेक ठिकाणी होणार असून काही ठिकाणी हलका पाऊस (Rain) तर काही ठिकाणी मेघगर्जने सह पाऊस पडणार असल्याची मोठी शक्यता दर्शवली जात आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा सह उत्तर महाराष्ट्रात ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान हवामान बदलण्याचा ( Climate Change) अंदाज व्यक्त केला जात आहे.
या भागात येल्लो अलर्ट (Yellow Alert )
८ जानेवारी ला अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर तर ९ जानेवारी ला अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आले आहे.
धुळे , नंदुरबार ६ जानेवारी
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे ७ जानेवारी
ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ ८ जानेवारी
मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागात ९ जानेवारी ला पाऊस पडण्याचा अंदाज दर्शवला आहे.