८ आणि ९ जानेवारीला मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
८ जानेवारी रोजी मराठवाड्यात (Marathwada) जोरदार वाऱ्यासोबत मेघगर्जना तसेच जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र,(Maharashtra) उत्तर कोकणात तुरळक पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज दर्शविला जात आहे. मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता दर्शवली आहे. ९ जानेवारीला हवामान खात्याने विदर्भात (Vidharbha) गारपीट पडण्याचा इशारा दिला आहे. (Climate Change)
पश्चिम चक्रवात तसेच अरबी समुद्रावरून होणार बाष्पाचा पुरवठा यामुळे हिमालय पर्वत आणि त्या लगतच्या राज्यात बर्फवृष्टी होत आहे. मध्य भारतीय राज्यामध्ये मेघगर्जना तसेच वीज आणि पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडली होती मात्र आता अनेक भागात थंडी थोडी कमी झाली आहे. राज्यात किमान तापमान १३ ते २१ अंशाच्या दरम्यान तर कमाल तापमान २७ ते ३३ अंशाच्या दरम्यान आहे. (Weather Change )